विदर्भात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा अंदाज

27 आणि 28 एप्रिल रोजी विदर्भात गारपीट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट पाहायला मिळेल.

पुणे: हवामान विभागाचे रोज नवनवे अंदाज समोर येत आहे. एकीकडे उष्णतेचे कहर केला असताना आता गारपीट आणि अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे. तसा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

27 आणि 28 रोजी विदर्भात गारपीट?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 27 आणि 28 एप्रिल रोजी विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे, एकीकडे विदर्भातील बहुतांश शहरांचा पारा 45 च्या पार गेलेला असताना आता गारपीटीची शक्यता आहे. शेती आणि पिकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असली तर उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना मात्र यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात संमिश्र हवामान

27, 28 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात दमट आणि उष्ण स्वरूपाचे हवामान राहणार आहे. या काळात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे सोलापूर, बीटड, हिंगोल, अहिल्यानगर, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. नागरिक सध्या उष्णेतेने हैराण आहेत.

राज्यात तापमान वाढलं?

राज्यात सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे, विशेष म्हणजे विदर्भात अकोला, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या भागात 44 ते 45 डिग्री पर्यंतचे तापमान आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे, बारामती, सोलापूर, फलटण, पुणे भागात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पार गेला आहे, हा पारा आणखी चढल्यास नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढू शकतो.


About Author

Rohit Shinde

Other Latest News