मराठी आदमी गंदा है…, तुम मटन, मच्छी खाते हो’, घाटकोपरमध्ये नॉनव्हेज खाण्यावरुन मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक

मराठी-अमराठी किती भांडायचं, रोज रोज मराठी माणसाला त्रास आणि अपमान. त्यामुळं आज आम्ही घुसलो काय ते ऐकदा होऊनच जाऊ दे. सगळ्यांची... फाटली, असं राज पार्टे यांनी पोस्टमध्ये म्हटलेय.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी असा वाद होताना पाहयाल मिळत आहे. गिरंगावात मराठी तरुणाला नोकरी नाकारण्यात आली होती. तर मनिष मार्केट येथे एका कपड्याच्या दुकानात मराठी कुटुंबाला मराठी बोलण्यावरुन तुम्ही मराठी बोलू नका, हिंदीत बोला असं म्हटलं होत. दुसरीकडे कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. हे सर्व प्रकार ताजे असताना आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार मुंबईतील घाटकोपरमध्ये घडला आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.

मराठी आदमी गंदा है…

दरम्यान, गेल्या महिन्यात आरएसएसचे भैय्याजी जोशींनी घाटकोपर विभागाची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचे म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद झाला होता. यानंतर आता घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानस्पद वागणूक दिल्यामुळं मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपरमधील एका मारवाडी, गुजराती आणि जैन लोकांच्या सोसायटीत मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. मांसाहार (Non Veg) बनविण्यावरुन ‘मराठी आदमी गंदा है…, तुम मटन, मच्छी खाते हो’, असे शाह नावाच्या एका व्यक्तीने म्हणत मराठी कुटुंबाला अपमानस्पद वागणूक दिली. यावरुन मनसेने याबाबत जाब विचारला आहे.

एकदा होऊनच जाऊ दे…

दुसरीकडे हा घडलेला प्रकार कळल्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होत या सोसायटीत घुसले. घडलेल्या प्रकाराबद्दल सोसायटीतील गुजराती, जैन आणि मारवाडी रहिवाशांना मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी जाब विचारला. त्यावेळी सोसायटीमध्ये मराठी-अमराठी असा कुठलाही भेदभाव नाही…, तसेच मांसाहार खाण्यावर येथे काही बंधन नसल्याचे गुजराती रहिवाशांनी सारवासारव करत सांगितले. दरम्यान, यावर मनसे नेते राज पार्टे सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात मराठी-अमराठी किती भांडायचं, रोज रोज मराठी माणसाला त्रास आणि अपमान. त्यामुळं आज आम्ही घुसलो काय ते ऐकदा होऊनच जाऊ दे. सगळ्यांची… फाटली, असं राज पार्टे यांनी पोस्टमध्ये म्हटलेय. तर जिथे मराठी माणसांवर अन्याय होईल, तिथे कानाखाली आवाज काढला जाईल, असं संदीप देशपांडेंनी इशारा दिला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News