मुंबई – मराठी चित्रपसृष्टीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रान्समधील ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवाला एक वेगळ महत्व आहे. दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘स्थळ’, या तीन मराठी चित्रपटांसह ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवात झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. आज मुंबईतील दादर येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी हि माहिती दिली.
महोत्सव कधी…?
दरम्यान, विकास महामंडळाच्या वतीने सन २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी ४ मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावा…, मराठी चित्रपटाची भूरळ जगातील प्रेक्षकांना पडावी, हा यामागचा उद्देश आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. यात इरावती कर्णिक, गणेश मतकरी, निखिल महाजन, आदित्य सरपोतदार आणि अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता. दरम्यान, फ्रान्समध्ये १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

चार चित्रपट कशावर आधारीत?
१) स्नो फ्लॉवर
‘स्नो फ्लॉवर’ या मराठी चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि भारतातील कोकण या दोन विभिन्न संस्कृतींशी दुवा कसा जोडला जातो, हे या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.
२) खालिद का शिवाजी
या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिम धर्मातील आहे. पण त्याला अन्य मुलं एकटं पाडतात. त्याच्यासोबत कोणीही नसते. खालिदचे निरागस डोळे आणि प्रमाणिकपणा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेत आहे, असं या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.
३) स्थळ
ग्रामीण समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन आदी बाबींवर आधारीत हा चित्रपट आहे. भारतातील खेड्यातील पारंपारिक विवाह पद्धत आणि व्यवस्था यांची कथा सांगणारा हा चित्रपट आहे.
४) जुनं फर्निचर
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि अभिनित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपटातून ज्येष्ठ नागरिकांची व्यथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपल्या पोटची पोरं आपल्याला कशाप्रकारे दूर करतात. आपला सांभाळ करत नाहीत. परिणामी यातून होणारे आईवडिलांचे हाल यावर जुनं फर्निचर हा चित्रपट भाष्य करतो.