Railway Express – रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. मुबंई बाहेर जाणाऱ्या एक्सप्रेस तथा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत होती. तसेच या दोन्हीमधील म्हणजे जनरल आणि स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
गर्दी कमी होण्याची शक्यता…
दुसरीकडे आगामी काळात १७ हजार स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात येणार आहे. अशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी एका पत्राव्दारे खासदार संजय दिना पाटील यांनी कळविली आहे. या कोचच्या संख्या वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. तसेच त्यांच्यावर आर्थिक बोजा पडणार नाही. आणि गर्दी कमी होऊन प्रवास देखील सुखकर होण्याची शक्यता आहे, असा विश्वास खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला आहे.

१७ हजार स्लिपर कोचची निर्मिती…
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील यांच्या मागणीला रेल्वे विभागाने हिरवा कंदीला दिला आहे. आगामी काळात १७ हजार स्लिपर कोचची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंह यांनी एका पत्राव्दारे दिली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२४ रोजी ३७७ अंतर्गत लोकसभेत मुद्दा मांडला होता. तसेच याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर कोचची संख्या कमी करुन वातानुकुलीत कोचची संख्या वाढविण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करीत आहे. मात्र याला प्रवाशांकडून विरोध होताना पाहयला मिळाले.