Nitesh Rane – मत्स्य विभागात जेव्हापासून नितेश राणे यांनी मंत्रीपदाचे सूत्र हाती घेतली आहेत. तेव्हापासून या विभागाला चालना देण्याचे काम केले आहे. तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून आता ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. सन 2024-25 या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढे झाले आहे. अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
367 अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई…
2024-25 मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान 67,907 मे. टन होते. तर सन 2024-25 मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये 3,396 मे. टनने वाढ झाली असून हे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढे झाले आहे. विभागामार्फत होणारी दिवस, रात्र सागरी गस्त व ड्रोनव्दारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून.
कृत्रिम भित्तीका पाखरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. 9 जानेवारी 2025 पासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून या यंत्रप्रणालीव्दारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण 367 अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली आहे
अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती…
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व सुधारणा (अध्यादेश), 2021 अन्वये सन 2024-25 मध्ये पर्ससीन मासेमारीस 12 सागरी मैलाच्या बाहेर कोणताही निर्बंध नसून बहुतांश पर्ससीन मासेमारी ही 12 सागरी मैलाच्या बाहेरच होत आहे. तसेंच परराज्यातील मच्छीमारांकडे मासेमारीकरीता वापरण्यात येत असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा स्थानिक मच्छीमारांच्या मासेमारी उत्पन्नांवर होणारा परिणाम होत आहे.
तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ल्यांचे प्रमाण इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी परप्रांतीय अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.