मुंबई : जिथून राज्याचा कारभार चालतो, त्या मंत्रालयमध्ये कामासाठी राज्यभरातून लोकं येतात. शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मोठी रांग लागलेली असते. दरम्यान, आता मंत्रालयातील सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशासाठी फेस रिकगनाईस सिस्टम (FRS) यंत्रणा बसविण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रालयाच्या परिसरातून एक आगीची घटना समोर येत आहे.
आगीचे कारण काय?
दरम्यान, मंत्रालय जवळ म्हणजे आकाशवाणी जवळील गेटला गार्डन गेट म्हणून संबोधले जाते. त्या गार्डन गेट जवळ असलेल्या पोलीस चौकीत आज गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे अग्नीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवली. त्यामुळं पुढील मोठा अनर्थ टळला.

नागरिकांची धावपळ…
दुसरीकडे मंत्रालय जवळील तीन नंबरच्या गार्डन गेट मधून मंत्री, आमदार, व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, अभ्यागत, अधिकारी आणि कर्मचारी यांची ये-जा करतात. दरम्यान, गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गार्डन गेट जवळ असलेल्या पोलीस चौकीत शार्ट सर्किट झाले. शाॅर्ट सर्किट झाल्याचे वृत्त काही वेळातच परिसरात पसरले. लोकांची एकच धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची बातमी समजाताच लोकांची मात्र धावफळ झाली.