महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वात धोका गुजराती लॉबीच्या नेत्यांकडून, संजय राऊतांचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या घरी काही लोकं जाऊन चर्चा केली. त्यांच्या कॅफेत लोकं चहा पिण्यास गेले आणि त्यानंतर हे वाद सुरू झाला आहे. मराठी ही आमची आई आहे तर इतर भाष्या या मावश्या आहेत. हिंदी भाषा सक्तीची नको किंवा लादायला नको.

मुंबई – सध्या हिंदा भाषा सक्तीची यावरुन वाद सुरु आहे. मराठी-अमराठी वाद सुरु आहे. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे ठरवून मुद्दे समोर आणले जाताहेत. राज ठाकरेंच्या कॅफेत चर्चा झाली, यानंतर हा वाद सुरू झाला आहे. पण महाराष्ट्राला आणि मराठीला, मराठी माणसाला सर्वात धोका कुणाकडून असेल तर तो गुजराती लांबीच्या नेत्याकडून आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी राज्यातील गुजरातधार्जिणे नेते यांच्यावर केला. आज त्यांनी माध्यमांशी मुंबईत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सरकारच्या चमच्यांकडून सुप्रीम कोर्टाला धमकी…

दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोयविरोधी पक्षांच्या लोकांचे माइक बंद केले जातात. अनुच्छेद १० च पालन केलं नाही, तेव्हा उपराष्ट्रपतींना जाग आली नाही. असं म्हणत राऊतांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या वक्तव्यावर टीका केली. पोलिसांचा आणि यंत्रणेचा विरोधकांवर गैरवापर केला जात आहे. ही कसली लोकशाही? आणि हे कसलं स्वातंत्र्य? सरकारचेच चमच्यांकडून सुप्रीम कोर्टाला धमकी दिली जात आहे. सुप्रीम कोर्टाला टाळ्या लावला पाहिजे, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.

मराठी ही आमची आई…

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. परंतु हे सगळं ठरवून केलं जात आहे. राज ठाकरेंच्या घरी काही लोकं जाऊन चर्चा केली. त्यांच्या कॅफेत लोकं चहा पिण्यास गेले आणि त्यानंतर हे वाद सुरू झाला आहे. मराठी ही आमची आई आहे तर इतर भाष्या या मावश्या आहेत. हिंदी भाषा सक्तीची नको किंवा लादायला नको. हिंदी भाषा जी देशांमध्ये बोलली जाते. संवादात्मक भाषा आहे. देशांमध्ये सर्वांना बोलण्यासाठी एक भाषा पाहिजे.

EVM वरील पहारा हटवण्यासाठी १० लाख…

विधानसभा निवडणूक भाजपाने कशाप्रकारे जिंकली हे माहित आहे. ईव्हीएम घोटाळा करून यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुका जिंकल्या आहेत. आणि ईव्हीएमवरचा पहारा हटवण्यासाठी दहा लाख रुपये भाजपाने दिले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. बोलायला सुरुवात केली की लगेच माईक बंद करतात. विरोधकांचा आवाज दाबतात. मी कुंभमेळ्यातील काही हजारो लोकं मृत्युमुखी पडली असं बोललो आणि लगेच माझा माईक बंद केला. सरकार विरोधी पक्षाला बोलू देत नाही, अशी सडकून टिका संजय राऊतांनी केंद्र सरकारवर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News