मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन हजार पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. प्रत्येक राज्य आपल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी खास विमान पाठणार असल्याची माहिती दिली होती. आता, कश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असून ते पर्यटकांना परत आणणार आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री शिंदे हे काश्मीरला रवाना झाले आहेत. रात्री 10 वाजता कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांना सुखरुप पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेची टीम कश्मीरमध्ये
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्यटकांशी एक टीम संवाद साधून आहे. अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे.
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. मी स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून सर्वांशी समन्वय…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 23, 2025
महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटक संजय लेले आणि दिलीप देसले, कौस्तुभ गणवते संतोष जगदाळे हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाला. याचे मृतदेह विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जात आहेत. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर येणार आहे. तेव्हा तेथे भाजप आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर हे उपस्थित राहणार आहे.