प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला १० एप्रिलला सुरुवात होणार, हरकती आणि सूचना मागविल्या…

अन्य ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कृती आराखडा तयार केलाय...

मुंबई : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी सुरू समोर येत आहे. मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील शंभर वर्षापेक्षा अधिक जुना असलेला पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणज साधारण १० एप्रिल रोजी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील जगन्नाथ भातणकर मार्गावरील पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शंभर वर्षापेक्षा अधिक जुना पूल…

दरम्यान, अटल सेतू ते थेट वांद्रे वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गकीसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील हा पूल तोडण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या जुन्या उडान पुलाच्या पाडकामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी 10 एप्रिलला मिळणार आहे. आणि 10 एप्रिलपासून या पुलाच्या पाडकामाच्या कामाला सुरुवात होईल, असे बोलले जाते. दरम्यान, हा ब्रिटिशकालीन आणि 125 वर्ष जुना पूल असल्याचं बोललं जातंय. शिवडी न्हावाशिवा अटल शेतीवरून वाहनांना थेट वरळी सी लिंक आणि दक्षिण मुंबई येथे जाता यावे यासाठी साडेचार किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार करण्यात येत आहे. याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र प्रभादेवीचा हा जुना पूल मध्ये असल्याने या मार्गिकेचे काम थांबले आहे. मात्र आता हा पूल तोडल्यानंतर इथले काम मार्गी लागणार आहे.

हरकती आणि सूचना मागवल्या…

दुसरीकडे हा जुना पूल 10 एप्रिलपासून तोडण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांच्या काही हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. हा पूल तोडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते सेनापती बापट मार्ग दरम्यानचा रस्ता साधारण वर्षभरासाठी बंद राहील. करी रोड पूल आणि उत्तरेकडे टिळक पुलावरून वाहतूक वळविण्यात जाईल. तसेच प्रभादेवी स्थानकावर नवीन पदाचारी पूल दक्षिण बाजूला बांधला जात असून, तो लवकरच पूर्ण होईल. या पुलावरील वाहतूक अन्य दिशेने वळविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक आराखडा तयार केल्याचीही माहिती समोर येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News