मुंबईत खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण, ५ जूनपर्यंत बॅरिकेटस हटवावेत, आयुक्तांचे निर्देश

पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे दिनांक ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील.

Mumbai Palika – मुंबईत रस्त्यांची कामे सुरु असताना आणि नाले सफाई सुरु असताना रविवारी रात्रीपासून  मुंबईत मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. त्यामुळं आता पालिका प्रशासन सतर्क झाले असून, मुंबईत खोदकाम केलेल्या आणि कामे सुरु असलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

५ जूनपर्यंत बॅरिकेटस हटवावेत….

दरम्यान, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट (PQC) (काँक्रिट ओतणे) रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. तर दिनांक २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होईल, आणि रस्त्यावरील सर्व रस्तारोधक (Barricades) हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होईल. याचे पालन करावे, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

पूर्ण झालेल्या रस्ते कोणत्या परिमंडळातील?

  • परिमंडळनिहाय पीक्यूसी पूर्ण झालेले एकूण रस्ते १,३८५
  • परिमंडळ १ – ८४ रस्ते
  • परिमंडळ २ – ५८ रस्ते
  • परिमंडळ ३ – २४२ रस्ते
  • परिमंडळ ४ – ३७७ रस्ते
  • परिमंडळ ५ – १९२ रस्ते
  • परिमंडळ ६ – ९८ रस्ते
  • परिमंडळ ७ – ३३४ रस्ते
  • एकूण पीक्यूसी पूर्ण झालेले रस्ते – १,३८५

About Author

Astha Sutar

Other Latest News