मध्य रेल्वेकडून प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीस तात्पुरती बंद, कारण काय?

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, निवडक आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

मुंबई – परीक्षा संपल्यामुळं शाळा-कॉलेजसना सुट्टी पडली आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. कमालीचा उकाडा आहे. त्यामुळं शाळा-कॉलेज सुरु होईपर्यंत अनेक मुंबईकर गावी किंवा फिरण्यासाठी बाहेर जातात. सुट्टीचा हंगाम असल्यामुळं अनेकजण गावी जाण्यास पसंदी देतात. यातच तिकिट आणि बुकिंग याचीही गडबड असते. सुट्टीच्या दरम्यान रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर आता मध्य रेल्वेने उपाययोजना काढली आहे.

कोणत्या कारणामुळं तिकिट बंद…

दरम्यान, मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, निवडक आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाश्यांच्या गर्दीचे नियोजन करणे, हे या निर्णयाचे उद्दिष्ट असल्याचेही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. परंतू प्रवास सुलभ आणि सुखकर होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, मुले, महिला, आणि निरक्षर व्यक्ती या प्रवाशांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

कोणत्या स्थानकारवर तिकिट मिळणार नाही…

दुसरीकडे रेल्वे स्थानक तिकिटांच्या विक्रीवरील तात्पुरते निर्बंध दिनांक १८.०४.२०२५ ते दिनांक १५.०५.२०२५ पर्यंत लागू राहणार आहेत. तर खालील ४ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होणार नाही.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
– लोकमान्य टिळक टर्मिनस
– कल्याण
– पुणे


About Author

Astha Sutar

Other Latest News