भाडे तत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

व्यवस्थित जबाबदारी पार पाडत नसलेल्या अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल तर, ते कदापि सहन केले जाणार नाही. असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Pratap Sarnaik : लालपरी अर्थात एसटीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दरम्यान, पाच हजार एकशे पन्नास भाडे तत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात कंपनी निष्क्रिय ठरली आहे. त्यामुळं या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

कोणत्या कारणामुळं करार रद्द…

दरम्यान, सध्या महामंडळाला बसेसची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनीसोबत केलेला निविदा करार रद्द करावा. २२ मे पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. म्हणून हा करार रद्द करण्यात यावा, असं सरनाईक यांनी म्हटलेय.

शिवशाही बसेसचे रुपांतर हिरकणीमध्ये…

सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या टप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम)बसेस मध्ये करण्यात यावे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात. तसेच राज्यातील विविध बस स्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. याबाबत प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित आहे, असं सरनाईक म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News