पुणे तिथे काय उणे? वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनविकार आणि दम्याच्या रूग्णांत मोठी वाढ!

पुण्यात गेल्या काही वर्षांत हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दमा आणि श्वसन विकारांच्या रूग्णांत मोठी वाढ झाली आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे, ज्यामुळे दमा अस्थमा आणि COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज) सारख्या श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ होत आहे.विशेषतः हिवाळ्यात तापमान कमी होणे, वायू प्रदूषणात वाढ आणि धुरामुळे या विकारांचे प्रमाण वाढले आहे. पुणे महापालिकेने 10 जानेवारी 2025 रोजी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना हवेच्या प्रदूषणाशी संबंधित आजारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना दैनंदिन श्वसनाच्या आजारांची माहिती IHIP आणि IDSP पोर्टलवर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अस्थमा, श्वसन विकाराचे रूग्ण 30 टक्क्यांनी वाढले!

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात अस्थमा तसेच श्वसन विकारांचा सामना करणाऱ्या रूग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना प्रदूषणामुळे अधिक धोका आहे. एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,  “दमा आणि COPD असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांना श्वासोच्छ्वासात अडचण, खोकला आणि ऑक्सिजनची गरज वाढली आहे.” दररोज 100 हून अधिक रुग्ण OPD मध्ये येतात, ज्यामध्ये 60% रुग्ण दमा आणि COPD चे आहेत.’

प्रदूषण वाढलं, काळजी घ्या

हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार आणि डोळ्यांचे त्रास वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काही काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरावा, शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे, विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले व दमा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. घरात एअर प्युरिफायरचा वापर करावा. झाडे लावून प्रदूषण कमी करण्यास मदत करावी. दररोज AQI (Air Quality Index) तपासूनच बाहेर जाण्याचा निर्णय घ्यावा. शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करावा आणि पुरेशी झोप घ्यावी. प्रदूषणग्रस्त भागांमध्ये जाणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्यावा.


About Author

Rohit Shinde

Other Latest News