धक्कादायक! मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाशांचा हल्ला, नेमकं काय घडलं?

अचानक विमानावरील हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. या घटनेमुळे सगळेजण थक्क झाले. मंगळवारी (9 मार्च) रोजी अकासा एयरचे विमान मुंबईहून दिल्लीला जात असताना, विमानावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाश्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे विमानातील प्रवाशांची तारांबळ उडाली. मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने विमानावर हल्ला केला. सुदैवाने हल्ल्यात कोणीही जखमी नाही. मात्र त्वरित घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने यावर कार्यवाही केली आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमान दिल्लीला रवाना झाले.

नेमके काय घडले?

दरम्यान, मंगळवारी 9 मार्च रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एयरचे विमान मुंबईहून दिल्लीला जात होते. विमान बे नंबर एवन वर थांबले. याच दरम्यान मोठ्या संख्येने एक मधमाशांचा थवा घोंगावू लागला. या मधमाश्यांच्या थव्याने काही क्षणातच विमानाला घेराव घालत, विमानावर हल्ला केला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रसंगावधान राखत विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी त्वरित धाव घेत, टीमने सुरक्षित आणि पर्यावरण पूरक पद्धतीचा वापर करून मधमाश्यांना विमानापासून हटवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असे म्हणावे लागेल.

घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक विस्कळीत…

मंगळवारी मधमाशांनी विमानावर अचानक हल्ला केल्यामुळे काही काळ हे विमान विमानतळावर थांबले आणि मधमाश्यांना हटवल्यानंतर काही वेळाने विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतले. परंतु या घटनेनंतर विमानतळ प्रशासक खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा मधमाश्यांचा थवा नेमका कुठून आणि कसा आला? विमानाचा गोगाट किंवा हवामानातील बदल… वातावरणातील तापमानात झालेली वाढ यामुळे हा मधमाशांचा थवा एकाच ठिकाणी जमा झाला का? किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा प्रकार असा घडला? याबाबत विमान प्रशासनाने दखल घेतली असून, याचा अभ्यास करून सखोल चौकशी करण्यात यावी, असे विमान प्रशासनाने सांगितले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News