आनंदाची बातमी! गारगाई धरणाच्या वन्यजीव व पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसाठी महत्वाचा निर्णय

मुंबईत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पासाठी 844.879. हेक्टर जमीन हस्तांतर करण्याचा प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांसाठी अतिरिक्त पिण्याचे पाणी मिळणार आहे.

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारी) मंजुरी दिली. यासह केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वच्छेने संपादित करण्याचा निर्णयही यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

प्रकल्पासाठी 844.879. हेक्टर जमीन…

दरम्यान, मुंबईत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पासाठी 844.879. हेक्टर जमीन हस्तांतर करण्याचा प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांसाठी अतिरिक्त पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळं उन्हाळा सुरु झाला की, मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट येत ते संकट आणि पाणी कपात आगामी काळात निर्माण होणार नाही. गारगाई धरणाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वन विभागाने वन्यजीव व पर्यावरण विषयक परवाने अटींच्या पूर्ततेच्या अधिन राहून द्याव्यात. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रृटीविरहीत प्रस्ताव सादर करून तातडीने वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी घ्याव्यात जेणेकरून गारगाई धरणाच्या प्रकल्पास गती मिळेल.

केंद्राच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण…

केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करावेत. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित कराव्यात. तसेच संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांचे राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने शिफारस केलेले प्रस्ताव मार्गी लावण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे पायाभूत सुविधा, प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या वन जमिनीच्या बदल्यात व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी स्वच्छा संपादित करून वनीकरणासाठी घेण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News