सातारा : गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आयोजित पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. शुक्रवारी रात्री शहा यांचे पुण्यात आगमन झाले होते. एकनाथ शिंदेंनी रात्रीच शहा यांची भेट घेतली होती.
अमित शहा यांची शिंदेंनी भेट घेतल्यामुळे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याकडून आपली अडकणूक होत असल्याची तक्रार त्यांनी केल्याची चर्चा होती. मात्र, याविषयी अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

अजित पवारांनी काय ते सांगून टाकले?
अजित पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना एकनाथ शिंदेंनी तुमची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली का? याची विचारणा केली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, अमित शाहजी मला असं काही बोलले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा.
मी सकाळापासून अमित शहांच्यासोबत
अजित पवारांनी सांगितले, मी सकाळापासून अमित शाहांच्यासोबत होतो. मी अमित शाह यांच्यासोबत सकाळपासून होतो. त्यांचे विमान मुंबई विमानळावरून टेक ऑफ होईपर्यंत होतो. सोबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे देखील होते. त्यामुळे सुत्रांच्या हवाल्याने सांगणं बंद करा