आकाशातून छतावर पडला 50 किलो वजनाचा धातू, उमरेडमध्ये भीती, नेमका काय घडला प्रकार?

हा तुकडा UFOच्या तबकडीचा असल्याचाही दावा केला जात आहे.

उमरेड, नागपूर – आकाशातून 50 किलो वजनाचा मोठा धातूचा तुकडा शनिवारी पहाटे उमरेडमध्ये घराच्या छतावर कोसळला. अमेय बसेशंकर यांच्या घराच्या छतावर पहाटे मोठा स्फोटाचा आवाज झाला. अर्धवट झोपेत असलेले घरातले घाबरुन आणि दचकून जागे झाले. हा आवाज इतका भयंकर होता की त्यांच्या घराच्या आसपासचे शेजारीही दचकून जागे झाले. हा धातूचा तुकडा पडल्यानं छताच्या भिंतीचं नुकसानही झालं. सिमेंट काँक्रिटचा स्लॅब असूनही विटा आणि दगडांचा खच छतावर पाहयला मिळत होता. हाच तुकडा एखाद्या पत्र्याच्या घरावर पडला असता तर त्यामुळं काही जणांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येणारी नव्हती.

धातूचा तुकडा पाहण्यासाठी उसळली गर्दी

उमरेड गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग धातुचा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. हा तुकडा पडला कसा याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली. अनेक जणं या धातूच्या तुकड्याचा आकार पाहून धास्तावले असल्याचंही सांगण्यात येतंय.

नेमकं काय घडलं ?

शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास अवकाशातून धातूचा तुकडा पडला. धातूचा तुकडा जेव्हा आकाशातून पडला तेव्हा तुकडा गरम होता. धातूचा तुकडा 50 किलो वजनाचा आहे. अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा आणि 4 फूट लांब आहे. यावरुनच हा तुकडा किती धोकादायक असेल याची कल्पना येऊ शकते.

हा तुकडा नेमका कशाचा?

आता हा तुकडा कशाचा आहे, यावरून एकच चर्चा रंगलीये. काही जण हा तुकडा विमानाचा असल्याचा दावा करताय तर काही जण हा तुकडा UFOच्या तबकडीचा असल्याचाही दावा करताय. तर काही जणांनी हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा भाग असू शकतो असा ही दावा केलाय.नागपूर येथील फॉरेन्सिक पथक या ठिकाणी पोहचलं आणि तेही आता या घटनेचा तपास करत आहेत.

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News