यकृत (लिव्हर) संबंधी आजारांची माहिती होण्यासाठी १९ एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लिव्हर ज्याला मराठीत यकृत असं म्हणतात ते केवळ रक्तच शुद्ध करत नाही, तर हार्मोन्स तयार करण्याचं, उर्जा स्टोअर करण्याचं आणि अन्न पचनाचं काम करतं. यकृत हा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये यकृतावर चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरवर योग्य उपचार न केल्यास यकृत खराब होऊ लागते. व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत होते, परिणामी इतर गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हर आजाराबाबत फारशी माहिती नसते. सामान्य भाषेत यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला ‘फॅटी लिव्हर’ म्हणतात.
फॅटी लिव्हरचे दोन प्रकार
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर

जास्त मद्यपान केल्याने ही समस्या उद्भवू शकते. समस्या जसजशी वाढत जाते, तसतसे ते यकृत फायब्रोसिस आणि यकृत सिरोसिसचे रूप घेऊ शकते.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर
चुकीचा आहार आणि सुस्त जीवन शैलीमुळे ही समस्या उद्भवते.
लक्षणे कोणती?
- थकवा येणे
- पोटात अस्वस्थता जाणवणे
- अचानक वजन कमी होणे
- सतत आजारी पडणे
- डोळे, नखे आणि त्वचा पिवळी पडणे
- ओटीपोटात दुखणे
- अपचन आणि गॅस तयार होणे
- अतिसार आणि सूज येणे
- भूक न लागणे
- उलटी होणे.
वरील पैकी कोणतीही लक्षणे वारंवार दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपचार
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चरबीयुक्त पदार्थ कमी खा. साखर आणि चरबीयुक्त आहाराचे सेवन कमी करा. उच्च-कॅलरी आहार टाळा. शारीरिक क्षमतेनुसार साधारण ३० मिनिटे व्यायाम करा. साखर नियंत्रणात ठेवा. नियमित औषधे घ्या. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची औषधे वेळेवर घ्या.
फॅटी लिव्हरच्या उपचारात औषधांचा केवळ २० टक्के प्रभाव दिसून येतो. ८० टक्के भूमिका निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराची आहे. डॉक्टर जीवनशैली आणि आहारातील बदलांवर भर देतात. बहुतेक लोक यातून सावरतात. जर एखाद्या व्यक्तीला अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल, तर त्याला अल्कोहोल सोडण्याचा सल्ला दिला जातो. निसर्गाने यकृताला ही अद्भुत शक्ती दिली आहे की दारू सोडल्या नंतर ते आपोआप दुरुस्त होते. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये, डॉक्टर रुग्णाला नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देतात आणि आहारात जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळतात.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)