चंदनाच्या झाडावर साप का राहतात? जाणून घ्या काय आहे कारण….

चंदनाच्या झाडावर साप राहतात का? जाणून घ्या

सापाचे नाव ऐकताच लोक घाबरतात.अनेक साप खूप विषारी असतात, तर काही सापांचे विष शरीरात खूप हळूहळू पसरते. ते बहुतेकदा झाडांवर राहतात. यापैकी, चंदनाचे झाड हे त्यांचे आवडते स्थान आहे कारण त्याचा वास थंड आणि सुगंधित असतो. चंदनाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. याचे लाकूड अनेक शुभ कार्यात वापरले जाते. चंदनाच्या मुळींचा वापर पूजेमध्येही केला जातो. तुम्हाला माहीत आहे का बहुतेक साप चंदनाच्या झाडावर का राहतात? जाणून घेऊया यामागचे कारण..

साप चंदनाच्या झाडांचे रक्षण करते

असे म्हटले जाते की साप चंदनाच्या झाडांचे रक्षण करतात. चंदनाची झाडे थंड असतात आणि सापांना थंड ठिकाणी राहायला आवडते. म्हणूनच ते विशेषतः उन्हाळ्यात या झाडावर लिपटून असतात. चंदनाचे झाड विविध प्रकारच्या लहान प्राण्यांना आकर्षित करते, जसे की कीटक, पक्षी आणि उंदीर. हे लहान प्राणी जे सापांसाठी शिकार देखील बनतात. ज्यामुळे साप चंदनाच्या झाडांवर अन्न मिळवतात. साप फक्त चंदनाच्या झाडावरच नाही तर चमेली आणि आणखी इतर झाडांवर आपले वास्तव्य करतात. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की साप चंदनाच्या झाडावर त्याच्या सुगंधा कडे आकर्षित होऊन त्यावर राहतात. 

हे झाड सर्वांनाच ओळखता येत नाही

चंदन घासल्याशिवाय त्याचा सुगंध येत नाही. म्हणूनच प्रत्येकजण ते ओळखू शकत नाही. त्याच वेळी, लोक या झाडाजवळ जाण्यास खूप घाबरतात. म्हणूनच येथे सापांना राहण्यासाठी शांत जागा मिळते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. यामुळे झाडाचेही नुकसान होत नाही. म्हणूनच चंदनाची झाडे बहुतेकदा सापांसाठी परिपूर्ण असतात.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News