Weight loss tips In Marathi: अनेकदा सोशल मीडियावर लोक वजन कमी करण्याच्या विविध पद्धती शोधत असतात. परंतु या पद्धतींचा काही खास फायदा मिळत नाही. त्यामुळे वजन कमी करण्याचा आत्मविश्वास डळमळतो. महिलांबाबत सांगायचे झाले तर डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये लोअर बेली अर्थातच पोटाच्या खालच्या बाजूला चरबी वाढण्याची समस्या उद्भवते. याशिवाय, अस्वस्थ जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे, शरीरात कॅलरीजची पातळी वाढू लागते. ज्यामुळे पोटावर मोठ्या प्रमाणात चरबी जमा होऊ लागते.
अशा परिस्थितीत, काही लोक जिममध्ये जातात, तर काही लोक विशेषतः नाश्ता वगळण्याचा निर्णय घेतात. यामुळे शरीराला अपचन आणि पोटफुगीसह थकवा येतो. परंतु निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि स्मार्ट जीवनशैली यासारख्या काही सवयी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. नियमित व्यायामामुळे पचनक्रियेचा वेग वाढतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आज आपण वजन कमी करताना होणाऱ्या काही चुका टाळण्याच्या पद्धती जाणून घेणार आहोत.

नाश्ता वगळू नका-
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करताना अनेकजण नाश्ता वगळतात. परंतु चुकीचे आहे. कारण नाश्ता न केल्याने शरीर ऊर्जेसाठी कॅलरी जाळण्याऐवजी त्या कॅलरीज साठवून ठेवतो. त्यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येतो.
कार्डिओ एक्सरसाईज-
वजन कमी करताना कार्डिओ एक्सरसाईज अत्यंत महत्वाची आहे. नियमित कार्डिओ केल्याने. मसल्स शरीराला वजन कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे वेगाने चरबी घटण्यास मदत होते. शिवाय शरीराची ऊर्जाही वाढते.
प्रोटीनचे सेवन-
वजन कमी करताना प्रोटीनचे सेवन फारच उपयुक्त ठरते. परंतु अनेकांना दिवसाला किती प्रोटीन घ्यावे याबाबत माहिती नसते. त्यामुळे आपल्या वयानुसार आणि वजननुसार आपल्याला किती प्रोटीनची आवश्यकता आहे याबाबत माहिती घेऊन प्रोटीनचे सेवन करा.
पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश-
वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीजचे परंतु हेल्दी पदार्थ खाणे गरजेचे असते. अशावेळी हिरव्या पालेभाज्या आणि फळे आपल्याला मदत करतात. यामुळे आवश्यक जीवनसत्वे आपल्या शरीरात जातातच शिवाय वजनही कमी होते.
पुरेशी झोप-
वजन कमी करताना अनेक लोक झोपेकडे कानाडोळा करतात. परंतु वेट लॉसदरम्यान ८ ते ९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)