Uric Acid Home Remedies: ज्या लोकांमध्ये युरिक अॅसिडची पातळी वाढली आहे त्यांना पायाची बोटे आणि सांध्यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. ही वेदना इतकी तीव्र असू शकते की लोकांना त्यामुळे चालणे कठीण होऊ शकते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने गाउट आजार होऊ शकतो. तसेच किडनी स्टोन वाढू शकतो. अशा परिस्थितीत, यूरिक अॅसिडशी संबंधित समस्या टाळण्यासाठी लोकांना यूरिक अॅसिडची पातळी वाढू नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि युरिक अॅसिडची पातळी वाढण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही या घरगुती पेयांची मदत घेऊ शकता.

कच्च्या हळदीचे पाणी-
युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही कच्च्या हळदीचे पाणी पिऊ शकता. कच्च्या हळदीमध्ये अँटी इंफ्लिमेंट्री, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक जळजळ कमी करण्याचे आणि युरिक अॅसिडशी संबंधित समस्यांपासून आराम देण्याचे काम करतात. हे पाणी पचनक्रिया देखील सुधारते. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास हळदीचे पाणी पिऊ शकता.
लिंबू पाणी-
तुम्ही दररोज सकाळी पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पिऊन तुमच्या युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करू शकता. तुम्ही दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यावे. असे केल्याने काही दिवसांत तुम्हाला आराम मिळेल.
काकडीचा रस-
काकडी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकते. तुम्ही काकडीचा रस त्यात चिया सीड्स मिसळून देखील पिऊ शकता. असे केल्याने युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.
ओव्याचे पाणी-
तुम्हाला माहिती आहे का की सकाळी रिकाम्या पोटी ओवा पाणी प्यायल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढण्यापासून रोखू शकता. ओव्याचे पाणी बनवण्यासाठी, एक किंवा दोन चमचे ओवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. काही दिवसांतच फरक दिसून येईल.
संत्र्याचा रस-
सायट्रिक अॅसिडने समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने शरीरात जमा होणारे यूरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते. युरिक अॅसिडसाठी संत्र्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला जास्त यूरिक अॅसिडची समस्या असेल तर तुम्ही संत्र्याचा रस पिऊ शकता. यामुळे सांध्यातील युरिक अॅसिड नष्ट होण्यास मदत होईल.