प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग खुलण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते. आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे, कोणती क्रीम वापरावी असे अनेकांचे प्रश्न असतात.यासाठी याठिकाणी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास, चेहरा गोरा होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील त्वचा गोरी करण्यासाठी जाणून घेऊयात या सोप्या टिप्स बद्दल.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी काही सोप्या टिप्स
- पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.
- नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
- पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
- त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.
- कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.
- साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.
चेहऱ्याची निगा कशी राखाल
- आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने वेळोवेळी स्वच्छ करावे. चेहरा क्लींजर ने साफ करत जा.
- आठवडयातून एकदा लिंबूचे साल आपल्या चेहऱ्यावर जरूर चोळा यामुळे चेहऱ्यावरील Pimples आणि Acne दूर होतील.
- स्वच्छ टॉवेल गरम पाण्यात भिजवून आणि पिळून लगेच चेहऱ्यावर ठेवा जोपर्यंत त्यामधील वाफ चेहऱ्यात जात आहे. या वाफेमुळे चेहऱ्याचे पोर्स मोकळे होतील. घाण स्वच्छ होईल आणि डेड स्कीन निघून जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
