Tips for Thyroid: थायरॉईडने त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय नियंत्रणात करतील समस्या

Home Remedies for Thyroid: तुम्हालाही आहे थायरॉईडची समस्या? 'हे' घरगुती उपाय करतील मदत

 How to Keep Thyroid Under Control:  आपल्या दैनंदिन जीवनातील छोटे-छोटे बदल हे थायरॉईड असंतुलनाचे कारण असल्याचे दिसून येते. यामुळे आपल्या शरीरात अनेक आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. खरंतर, थायरॉईड ही घशात असलेली एक ग्रंथी आहे. जी हार्मोन्स तयार करते. यामुळे शरीरातील रक्तदाब नियमित राहतो आणि चयापचय देखील वाढतो. जेव्हा थायरॉईड ग्रंथी हार्मोन्स तयार करण्यात अयशस्वी होते तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. ज्यामुळे बहुतेक महिलांना केस गळणे, वाढणारे वजन आणि इतर आरोग्य समस्यांचा त्रास होऊ लागतो. आजकाल मोठ्या संख्येने महिला थायरॉईड असंतुलनाने ग्रस्त आहेत. म्हणूनच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. आज आपण थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

गॉयट्रोजन असलेले पदार्थ टाळा-

दैनंदिन आहारात साधे बदल करून थायरॉईडच्या समस्या टाळता येतात. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी, तुमच्या जेवणात हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि हंगामी फळे समाविष्ट करणे महत्वाचे आहे. याशिवाय, ज्या पदार्थांमध्ये गॉयट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यांना तुमच्या आहाराचा भाग बनवू नका. यामध्ये विशेषतः ब्रोकोली, कोबी आणि टोफूसारखे पदार्थ टाळा. याशिवाय स्ट्रॉबेरी आणि शेंगदाणे खाणे देखील टाळा. हायपोथायरॉईडीझम टाळण्यासाठी, तुमच्या आहारात लाल तांदूळ, सूर्यफूलची बियाणे आणि दही यांचा समावेश करा.

आहारात व्हिटॅमिन ई चा समावेश-

त्वचा आणि केसांव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ई आपल्या संपूर्ण शरीरासाठी देखील खूप महत्वाचे आहे. देशी तूप आणि अक्रोड सारख्या सुक्या मेव्यापासून मिळणारे हे पोषक तत्व शरीरातील थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. खरंतर, शरीरात चरबीत विरघळणारे अँटिऑक्सिडंट्स व्हिटॅमिन ई पासून मिळतात. जे आपल्या शरीराचे अनेक प्रकारच्या समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे व्हिटॅमिन ई ची कमतरता टाळण्याचा प्रयत्न करा.

आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश-

भरपूर व्हिटॅमिन ए घेतल्याने शरीरातील थायरॉईडचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते. गोड बटाटे, गाजर, जर्दाळू आणि पालेभाज्यांमध्ये आढळणारे हे पोषक तत्व शरीराला सक्रिय ठेवते. याशिवाय काजू, मनुका, बदाम आणि डाळींमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए शरीराला स्नायूंच्या क्रॅम्पच्या समस्येपासून वाचवते. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात घ्या.

व्यायाम-

तज्ज्ञांच्या मते, योगा आणि घशाचे व्यायाम करून थायरॉईड नियंत्रित करता येते. याशिवाय, नियमित व्यायामामुळे शरीरात थायरॉईड संप्रेरकांचे संचार होण्यास मदत होते. जर तुम्ही सकाळी उठून ३० मिनिटे व्यायाम केला तर थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत धावणे, जॉगिंग, नृत्य आणि योगा यांचाही समावेश करू शकता. दररोज असे केल्याने तुमचे शरीर निरोगी राहील.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News