सकाळी चालण्याचे आहेत जबरदस्त फायदे

दररोज चालणं आरोग्यासाठी चांगलं जाणून घ्या फायदे

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सकाळी चालल्याने वजन कमी होते, हृदयविकार आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. तसेच, मानसिक तणाव कमी होतो. व्यायाम हा चालणे, पळणे, दोरीउड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग, पोहणे, वजन उचलणे अशा अनेक प्रकारांनी करता येतो. यापैकी सर्वात सोपा व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो ‘चालण्याचा व्यायाम’ हा आहे. त्यामुळेचं सर्वांसाठी ‘चालणे’ हा एक उत्तम व्यायाम आहे.

चालण्याचे फायदे…

नियमित चालल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, हाडे बळकट होतात, अतिरिक्त चरबी कमी होते आणि स्नायूंमधील ताकद वाढते.

शरीर मजबूत होते

नियमित चालल्याने मांसपेशी, हाडे व सांधे मजबूत होतात त्यामुळे शारीरिक स्टॅमिना वाढतो.

रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.

दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होते. त्यामुळे शरीरातील हृदय, मेंदू यासारख्या सर्वच महत्वाच्या अवयवांत ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो.

रक्तदाब नियंत्रित राहतो

नियमित चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. ब्लडप्रेशर नियंत्रित असणे खूप महत्त्वाचे असते. कारण वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करणे उपयुक्त ठरते. याशिवाय चालण्यामुळे रक्तात वाढलेले वाईट कोलेस्टरॉलही कमी होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित राहतो

चालण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांसाठी चालणे हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे.

वजन नियंत्रित राहते

नियमित चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या असल्यास चालण्याचा व्यायाम आवर्जून करा. यांमुळे शरीरातील चरबी कमी होऊन शरीर मजबूत होईल.

गंभीर आजारांचा धोका कमी होतो

चालण्याचा व्यायाम केल्याने वजन, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदयविकार, मधुमेह, हाय ब्लडप्रेशर आणि किडनी निकामी होण्याचा धोका कमी होतो.

झोप व्यवस्थित लागते

नियमित चालण्यामुळे रात्री झोप चांगली होण्यास मदत होते तसेच मानसिक ताणतणावही दूर होण्यास मदत होते. त्यामुळे झोपेच्या तक्रारी असल्यास दररोज सकाळी चालण्यास जावे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News