उन्हाळ्यात थंड राहा, या सोप्या घरगुती उपायांनी स्वतःला निरोगी आणि ताजेतवाने ठेवा…..

या उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी करा हे उपाय; जाणून घ्या...

उन्हाळ्याचा ऋतू म्हणजे सततचा घाम, थकवा, उष्णतेची झळ आणि त्यामुळे होणारी चिडचिड. मात्र जर योग्य काळजी घेतली, तर याच ऋतूत तुम्ही उर्जावान आणि ताजेतवाने राहू शकता. यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते.दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे आणि या ऋतूतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवणे. जर पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर सुस्ती, थकवा आणि चक्कर यासारखे त्रास सुरू होतात. त्यामुळे ‘हायड्रेशन’ हा उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्याचा मुख्य मंत्र आहे. देशाच्या अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, स्वतःला हायड्रेटेड ठेवणे हा उष्णतेशी लढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

उन्हाळ्यात निरोगी आणि ताजेतवाने राहा

या कडक उन्हात निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आपल्याला यामध्ये मदत करू शकतात. लिंबू पाणी पिणे किंवा ताक पिणे, हंगामी फळे खाणे आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणे. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत जे या हंगामात तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने ठेवतील.

गुलकंदाच थंडगार सरबत

१-२ चमचे गुलकंद थंड पाण्यात किंवा दुधात मिसळा. त्यात थोडी बडीशेप पावडर आणि वेलची घाला. चवीसाठी तुम्ही मध देखील घालू शकता. गुलकंद शरीरातील अंतर्गत उष्णता थंड करते आणि मनाला ताजेतवाने ठेवते. त्याची चवही खूप चांगली आहे.

कैरीचे पन्ह

कैरी उकळून त्याचा गर काढा. कैरी थंड झाल्यानंतर तिची साल काढा आणि हाताने दापून त्याचा गर काढा. कोय बाजूला ठेवा.एक मिक्सर जार घ्या. त्यात कैरीचा गर घाला आणि भाजलेले जिरे पूड, काळे मीठ, पांढरे मीठ, साखर आणि पुदिन्याची पाने घाला. यात 4 ते 5 बर्फाचे तुकडे घाला आणि ज्या पाण्यात आंबे उकळले ते पाणी घालून बारीक वाटून घ्या. तुमच्या गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळा आणि चांगले मिक्स झाले की गाळूनते प्या. उन्हाळ्यात हे एक रामबाण औषध आहे कारण ते उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण करते, पचन सुधारते आणि त्वरित ऊर्जा देते.

टरबूजाच्या सालीचा रस

उन्हाळ्यात आपण सर्वजण टरबूज खातो. पण आपण त्यांची साले फेकून देतो. पण तुम्ही त्यांच्यापासून खूप आरोग्यदायी रस बनवू शकता. यासाठी, कलिंगडाची साल (पांढरा भाग) कापून मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध घाला आणि नंतर गाळून घ्या. तुमचा रस तयार आहे. टरबूजाच्या सालीमध्ये भरपूर पोषक घटक असतात जे हायड्रेशन वाढवतात आणि त्वचेला चमक देतात.

दुधी भोपळ्याचं सरबत

दुधी भोपळ्याचे दोन्ही टोके आणि साल काढून घ्या. आतला गर काढून घ्या. भोपळा किसून त्याचा रस काढा. त्यात पुदिना, लिंबाचा रस, काळे मीठ आणि थोडे मध घाला. तुमचा सरबत तयार आहे. दुधी शरीराला थंड ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. 

चंदन पावडर

थंड पाण्यात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर तसेच हात आणि पायांना लावा. चंदन त्वचेला थंडावा देते, घामाचा वास कमी करते आणि आतून थंडावा देते.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News