Sabudana Vada Marathi Recipe: कुरकुरीत साबुदाणा वडा चवीला अप्रतिम असतो. पण जेव्हा साबुदाणा वडा बनवण्याचा विचार येतो तेव्हा बहुतेक महिलांचा खूप गोंधळ होतो. लोक मिश्रण तयार करण्यापासून ते वड्याला आकार देण्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धती वापरतात. जर तुम्हाला हे वडे कमी वेळात सोप्या पद्धतीने बनवायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम रेसिपी घेऊन आलो आहोत. जी चवीसोबतच या शरीरामध्ये पोषण पातळी वाढवण्यास देखील मदत करते. कोणत्याही गोंधळाशिवाय साबुदाणा वडा बनवण्याची सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी जाणून घेऊया.
साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य-
-साबुदाणा १ कप
-शेंगदाणे १/२ कप
-जिरे १ टीस्पून
-चिरलेल्या हिरव्या मिरच्या २ ते ३
-कसुरी मेथी १ टीस्पून
-कढीपत्ता ५ ते ६
-काळी मिरी १/४ टीस्पून
-उकडलेले बटाटे १ ते २
-लिंबाचा रस २ चमचे
-चवीनुसार मीठ

साबुदाणा वडा बनवण्याची रेसिपी-
-साबुदाणा वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा ३ ते ४ तास भिजत ठेवा. साबुदाणा मऊ झाल्यावर तो गाळून वेगळ्या भांड्यात काढा.
-आता त्यात अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घाला आणि मिक्स करा.
-आता १ चमचा जिरे, चिरलेली हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
-आधी उकडलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घ्या आणि त्यात कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला आणि मिक्स करा.
-जर तुम्हाला त्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही ३-४ वाळलेल्या कढीपत्त्याची पाने कुस्करून त्यात घालू शकता. आता सर्व मिश्रण एकत्र करा.
-तयार मिश्रण हातात घ्या आणि त्याला वड्याचा आकार द्या.
– आता एका कढईत तेल गरम करून वडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.