Parenting Tips: मुलांसमोर चुकूनही बोलू नका ‘या’ ५ गोष्टी, मानसिक विकासावर होईल वाईट परिणाम

Parenting Tips Marathi: मुलांसमोर चुकूनही बोलू नका 'या' ५ गोष्टी, बिघडेल मानसिक आरोग्य

 How Parents Should Treat Children:  आजच्या काळात पेरेटिंग अर्थातच योग्य पालकत्व अत्यंत महत्वाचे आहे. लहानसहान गोष्टींसाठी मुलांना दररोज फटकारल्याने त्यांच्या विकासावर काही प्रमाणात परिणाम होतो. या कारणास्तव, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्याशी एक मजबूत नाते निर्माण करणे खूप महत्वाचे बनले आहे.  परंतु अनेक वेळा पालक नकळत त्यांच्या मुलांना अशा काही गोष्टी सांगतात, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो किंवा त्यांच्याशी असलेले आपले नाते बिघडू शकते. त्यामुळेच पालकांनी चुकूनही आपल्या मुलांसमोर या काही गोष्टी बोलणे टाळावे. अथवा त्यांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

 

१) इतरांशी तुलना-

आपण अनेकदा आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांचे उदाहरण देऊन अनेक गोष्टी  सांगतो. अशावेळी इतरांशी तुलना करून, आपले मूल स्वतःला कमी समजू लागते आणि त्याला मत्सर किंवा राग येऊ शकतो. त्यामुळे आपल्या मुलांसमोर असे बोलणे टाळा.

 

२)नकारात्मक गोष्टी-

आपण अनेकदा मुलाला तुझ्याकडून काहीही नाही होणार हे सांगतो. पण यामुळे मुलांचा स्वाभिमान दुखावतो आणि त्यांना स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते. त्याऐवजी तुम्ही असे म्हणा, “प्रयत्न करत राहा, मला खात्री आहे कीतुला नक्की यश मिळेल.” यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

 

३) पालकांचा आदर नाही-

अनेकदा पालक मुलांना तुम्ही आमचा आदरच करत नाही असे म्हणतात. परंतु  यामुळे मूल स्वतःला दोष देऊ लागते. आणि पालकांपासून स्वतःला दूर करू शकते. त्याऐवजी, म्हणा, “तुम्ही समजूतदारपणे वागता तेव्हा आम्हाला ते खूप आवडते. यामुळे मुलांमध्ये आणखी आत्मविश्वास वाढीस लागतो.

 

४) नेहमी चुका काढणे-

अनेकदा पालक मुलांच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सतत त्यांच्या चुका शोधत असतात. शिवाय तू कधीच काही बरोबर करत नाहीस असे बोलतात. अशा शब्दांमुळे मुलाला असे वाटू शकते की तो कधीही काहीही बरोबर करू शकत नाही. त्याऐवजी म्हणा, “यावेळी मी चूक केली, काही फरक पडत नाही, पुढच्या वेळी मी योग्यरीत्या करेन”. यामुळे मुलांमध्ये नवी उमेद निर्माण होते.

 

५)बोलू न देणे-

अनेक पालकांना सवय असते कि आपल्या मुलांना बोलू द्यायचं नाही. याउलट त्यांना गप्प राहायला सांगायचं. परंतु मुलांना हे सांगणे योग्य नाही.  यामुळे मुलाला आपले विचार व्यक्त करण्यास भीती वाटते आणि मुक्त संवाद हळूहळू कमी होतो. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा. अशाने तुमच्यातील नातेसंबंध घट्ट होतील.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News