Memory Boosting Remedies: तुम्हीही लहान-लहान गोष्टी विसरता? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा सोपे उपाय

Tips to Boost Memory: तुम्हीही लहान-लहान गोष्टी विसरता? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फॉलो करा घरगुती टिप्स

Home Remedies to Boost Memory:  वाढत्या वयानुसार शरीरात त्वचा, केस, शरीराची स्थिती आणि काम करण्याची क्षमता यासह अनेक बदल होतात.  तर स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा अभावदेखील वाढू लागतो. खरं तर, ताणतणाव आणि वाढत्या कामाच्या व्यापामुळे खाण्याच्या सवयी बदलू लागतात. तसेच, झोपेचे चक्र बिघडते, ज्यामुळे लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जीवनशैलीत काही मूलभूत बदल केल्याने मेंदूला तीक्ष्ण होण्यास मदत होते. आज आपण दैनंदिन गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या टिप्स मदत करतात याबाबत जाणून घेणार आहोत.

 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय-

झोपेची गुणवत्ता सुधारा-

चांगली झोप घेणे ही स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्याचा एक सोपा मार्ग आहे. दररोज रात्री किमान ७-९ तासांची चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. तसेच, झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. यामुळे शरीराचे चक्र नियमित राहण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, झोपेचा अभाव शिकण्याची क्षमता ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.

 

ताणतणाव नियंत्रित करा-

एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे ताणतणाव टाळणे होय . ताणतणाव स्मृती आणि एकाग्रतेवर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो. लर्निंग मेमरी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दीर्घकालीन ताणामुळे हिप्पोकॅम्पसचे नुकसान होऊ शकते. जो मेंदूचा असा भाग आहे जो आठवणी तयार करण्यास मदत करतो. याशिवाय, कामांना प्राधान्य देणे आणि मल्टीटास्किंग टाळणे देखील ताण कमी करण्यास मदत करते.

ध्यानधारणा करा-

सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ ध्यानधारणा केल्याने मनाला त्रास देणारे विचार कमी होण्यास मदत होते आणि तणावातून आराम मिळतो. यामुळे मन ताजेतवाने राहते आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता आपोआप सुधारू लागते. याशिवाय, सहनशक्तीदेखील सुधारू लागते. ध्यानासाठी नियमित वेळ आणि ठिकाण निवडणे फारच आवश्यक आहे.

 

व्यायाम करा-

स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी व्यायाम फायदेशीर आहे. आठवड्यातून किमान ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम करा. यामध्ये चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकलिंग यासारख्या  व्यायामांचा समावेश असू शकतो. ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे व्यायाम केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते. यासोबतच चिंता आणि ताणही कमी होऊ लागतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे संज्ञानात्मक घट होण्याचा दर कमी होऊ शकतो आणि डिमेंशियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

स्वतःला व्यग्र ठेवा-

व्यग्र वेळापत्रक तुमच्या मेंदूची एपिसोडिक स्मृती नियंत्रणात ठेऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, व्यग्र वेळापत्रक चांगल्या संज्ञानात्मक कार्याशी जोडले गेले आहे. यामुळे मेंदू दिवसभर सक्रिय राहतो, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारते.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News