हॉटेलच्या खोल्यांमध्ये घड्याळ का नसतं ? जाणून घ्या कारण

हॉटेलच्या खोल्यांमध्ये घड्याळ नसण्यामागील कारणे काय आहेत माहीत आहे का? याची काही कारणे आहेत. तीच आज पाहणार आहोत.

जर तुम्ही कधी पंचतारांकित किंवा तीन तारांकित हॉटेलमध्ये राहिला असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की तिथे एसी, टीव्ही, मिनी फ्रिज, अलार्म सेवा असे सर्व काही आहे पण एक गोष्ट नाहीआहे, ती म्हणजे घड्याळ. आता प्रश्न असा पडतो की इतक्या आलिशान आणि पूर्णपणे सुसज्ज हॉटेलच्या खोलीत घड्याळ का नाही? हे जाणूनबुजून केले जात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे? चला जाणून घेऊया यामागील कारण..

वेळेच्या ताणापासून दूर ठेवणे

हॉटेलच्या खोलीत घड्याळ न ठेवण्यामागे एक खास कारण आहे. हॉटेल मालक असं मानतात की, जर खोलीत घड्याळ नसेल, तर अतिथी वेळेच्या पाशात न अडकता, आरामात आणि मनसोक्त वेळ घालवतील. हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव अधिक सुखद आणि तणावमुक्त करण्यासाठी ही युक्ती वापरली जाते. अतिथींना वेळेचं बंधन नसेल, तर ते अधिक आरामशीरपणे हॉटेलमधील सुविधांचा आणि परिसराचा आनंद घेऊ शकतात. 

टाइम झोनचा डिफरन्स

वेगवेगळ्या देशांचे लोक अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये येतात. प्रत्येक देशाचा वेळ क्षेत्र वेगळा असतो. अशा परिस्थितीत, जर खोलीत घड्याळ असेल आणि ते स्थानिक वेळ दाखवत असेल, तर पाहुणे गोंधळून जाऊ शकतात. याचा त्यांच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हॉटेल व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

हॉटेलचा नफा

बऱ्याच वेळा, भिंतीवर घड्याळ नसल्यामुळे, अतिथी निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ राहतात, ज्यामुळे हॉटेल मालकांना प्रचंड फायदा होतो. ही युक्ती आजकाल नफा कमावण्याचे साधन बनली आहे.

देखभाल आणि अचूकता

घड्याळांची नियमित देखभाल करणे आणि त्यांची वेळ अचूक ठेवणे हे एक मोठे काम आहे. अनेक हॉटेल्ससाठी, ही देखभाल करणे खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया असू शकते. खोल्यांमध्ये घड्याळे न ठेवल्यास, हॉटेलचा देखभाल खर्च कमी होतो. तसेच, घड्याळे खराब होण्याची किंवा हरवण्याची शक्यता देखील कमी होते. घड्याळे अनेकदा चुकीचे वाजण्याची किंवा बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे, पाहुण्यांना गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेल्समध्ये घड्याळे ठेवत नाहीत. 

स्मार्टफोनचा प्रभाव

आजकाल, बहुतेक लोक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये वेळ पाहू शकतात, त्यामुळे भिंतीवरील घड्याळाची गरज कमी झाली आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News