शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. तुरटी अनेक प्रकारे आरोग्यासाठी गुणकारी आहे. त्वचेची काळजी, तोंडाचे आरोग्य, रक्तस्त्राव थांबवणे, आणि बुरशीजन्य संसर्ग यांसारख्या समस्यांवर तुरटीचा उपयोग होतो. तुरटी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुरटीचा योग्य उपयोग केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाते आणि कोणत्याही प्रकाचा संसर्गाचा आजार होत नाही. आरोग्यासोबत तुरटी तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेचे आजार
तुरटीचा योग्य वापर केल्यास, त्वचेचे काही आजार कमी होण्यास मदत मिळू शकते. तुरटीचा वापर त्वचेचे आजार असल्यास केला जाऊ शकतो. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्यामुळे, ती त्वचेवरील संसर्ग कमी करण्यास मदत करते. तसेच, तुरटीमुळे त्वचेवरील डाग, मुरुम आणि पिंपल्स कमी होतात, त्वचा घट्ट होते आणि जळजळ व लालसरपणा कमी होतो. तुरटी त्वचेला गंभीर संसर्गापासून वाचवते. तुरटीचा वापर करण्यासाठी, तुरटीची पावडर किंवा तुरटीचे पाणी वापरले जाऊ शकते. तुरटीचा वापर नियमितपणे केल्यास त्वचेची समस्या कमी होते.

दातांच्या समस्यांसाठी फायदेशीर
यूरीन इन्फेक्शन
तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी मायक्रोबियल गुण असतात. यूरीन इन्फेक्शन दूर करण्यासाठी इंटिमेट एरियाला तुरटीच्या पाण्याने वॉश करता येऊ शकतं. तुरटीच्या पाण्याने प्रभावित भाग स्वच्छ केल्यास, जीवाणू नष्ट होण्यास मदत होते.
खोकला होतो दूर
तुरटीचा वापर करून खोकल्याची समस्या दूर करता येते. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. तुरटीच्या पाण्याने गुरळा केल्याने घशातील खवखव दूर होते. आणि खोकला बरा होतो. तसेच, तुरटीचे पावडर मधासोबत सेवन केल्यानेही खोकल्यात आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)