जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन का साजरा केला जातो जाणून घ्या

जागतिक पुस्तक दिनाचा उद्देश आणि महत्त्व जाणून घ्या...

जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुस्तकांच्या माध्यमातून विचारमंथनास चालना देण्यासाठी युनेस्कोने सुरू केला आहे. या दिवशी आपण साहित्य, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सन्मान करतो. पुस्तके ही मानवी संस्कृतीचा पाया आहेत. पुस्तक केवळ ज्ञानाचे भांडार नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्याचे साधन देखील आहेत. पुस्तके अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळवतात.

जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास

१९९५ मध्ये युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन म्हणून घोषित केला. २३ एप्रिल हा दिवस जगातील तीन महान लेखकांचा पुण्यतिथी दिवस आहे, पहिले शेक्सपियर, दुसरे सर्व्हेंटेस आणि तिसरे इंका गार्सिलासो. म्हणून, या दिवसाचे साहित्यिक महत्त्व लक्षात घेऊन, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

पुस्तकांचे महत्त्व

ज्याप्रमाणे दिवा अंधारात प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे पुस्तके अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळवतात. पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहेत. या पुस्तकांमधून आपल्याला विविध विषयांची माहिती मिळते. साहित्यिक पुस्तके मानवी मूल्ये विकसित करतात. वाचनामुळे मनात नवीन कल्पना येतात. त्यामुळे कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. वाचनामुळे ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.

जागतिक पुस्तक दिनाचा उद्देश

जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये वाचनाची सवय लावणे, साहित्याबद्दल जागरूकता पसरवणे आणि कॉपीराइट संरक्षणाला प्रोत्साहन देणे. या दिवशी जगभरातील शाळा, ग्रंथालये आणि सांस्कृतिक संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. लेखन वाचन, पुस्तक मेळे आणि साहित्यिक चर्चा होतात. जागतिक पुस्तक दिन आपल्याला आठवण करून देतो की पुस्तके ही केवळ कागदाची पाने नाहीत तर ज्ञान आणि प्रेरणेचा खजिना आहेत.
या दिवसाचा विशेष उद्देश म्हणजे लोकांना पुस्तके आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन जगभरातील साहित्यिक, लेखक आणि वाचकांना जोडतो.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News