हातांना सारखा घाम का? ‘हे’ असू शकते त्यामागचे कारण…

तुमच्याही हातांना वारंवार घाम येतो? वेळीच सावध व्हा

घाम येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, मात्र काही लोकांच्या हाताला सतत घाम येत असतो. हातांना घाम येणं ही सामान्य गोष्ट नाही तर यामागे एखादा आजारही असू शकतो. या आजाराला हायपरहाइड्रोसिस म्हणतात. शारीरिक कमतरतेमुळे होतो. तुमच्या शरीरात जर एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर अशा वेळी हा आजार उद्भवतो. या आजार संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

हातांना घाम का येतो?

घाम येणे हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे एक नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा शरीर गरम होते, तेव्हा घाम येऊन ते थंड होते. काही लोकांना जास्त घाम येण्याची समस्या असते, ज्याला हायपरहाइड्रोसिस म्हणतात.

पाल्मर हायपरहाइड्रोसिस म्हणजे काय?

पाल्मर हायपरहाइड्रोसिस (Palmar Hyperhidrosis) म्हणजे हातांच्या तळव्यांवर जास्त घाम येण्याची समस्या. या स्थितीत, सामान्यतः हातांच्या तळव्यांवर जास्त घाम येतो, कधीकधी इतर ठिकाणी देखील घाम येतो.

घाम नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय

  • तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी सुधाराव्या लागतील. गरम पराठे, मसालेदार भाज्या किंवा जास्त चहा-कॉफी, या सर्व गोष्टी  कमी करा किंवा बंद करा.
  • दही, लस्सी, लिंबूपाणी किंवा फळे यासारख्या थंड पदार्थांचा वापर करा.

  • दिवसभरात शक्य तितके पाणी प्या, कमीत कमी ८-१० ग्लास, जेणेकरून शरीर आतून थंड राहील आणि त्यासोबतच थंड पाण्याने हात वारंवार धुवा, विशेषतः जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा.

  • रात्री झोपण्यापूर्वी, एक बादली कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घाला आणि त्यात आपले हात १५ ते २० मिनिटे बुडवा.

  • कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने हात धुवा. ही पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते, विशेषतः जर तुमच्या हातांना दुर्गंधी येत असेल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News