दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की हायड्रेटेड राहणे, पचन सुधारणे, त्वचेला मॉइश्चरायझ करणे आणि ऊर्जा पातळी वाढवणे. पाणी प्यायल्याने तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता आणि विनाकारण भूक लागत नाही. पोटात अल्सर आणि गॅस होण्यास प्रतिबंध करते. तसेच शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
पाणी पिण्याचे फायदे
- पुरेसे पाणी पिणे पचन क्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
- त्वचेला तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवते. ज्यामुळे ती कोरडी होत नाही आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
- निर्जलीकरणामुळे होणारा थकवा व डोकेदुखी दूर राहते.
- उन्हाळ्यात आणि जास्त घाम येत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा.
- गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी अधिक पाणी प्यावे.
- पाणी कमी प्यायल्यास तोंड कोरडे पडणे, लघवीचा रंग गडद होणे, थकवा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
कोणत्या वेळी पाणी पिणे योग्य
- सकाळी उठल्यावर एक दोन ग्लास पाणी प्या शरीर डिटॉक्स होते.
- जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्या. भूक नियंत्रित होते आणि पचन सुधारते.
- व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी प्या. स्नायू तंदुरुस्त राहतात.
- रात्री झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्या . शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी पिऊ नका.
जास्त पाणी प्यायल्यानं होणाऱ्यास समस्या
जास्त पाणी प्यायल्यानं ओव्हरहायड्रेशनची समस्या सुरु होते. यामुळे मळमळ, उलट्या डोकेदुखी, हाय-पाय दुखणं, ओठांवर सूज अशा समस्या उद्भवू शकतात. तसंच अधिक पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट लेव्हल देखील कमी होते. इलेक्ट्रोलाईट पातळी कमी झाल्यास मांसपेशीत वेदना, क्रॅम्प आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच कोमा किंवा मृत्यूचा देखील होवू शकतो.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)