Jyotiba Phule Jayanti: ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा प्रेरणादायी विचार, इथे आहेत एकापेक्षा एक संदेश

Mahatma Jyotiba Phule: ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा प्रेरणादायी विचार, इथे आहेत मराठी संदेश

Jyotiba Phule Marathi Quotes:   महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रात झाला. दरवर्षी हा दिवस ज्योतिबा फुले जयंती म्हणून साजरा केला जातो. ते भारतातील आघाडीच्या समाजसुधारकांपैकी एक होते. त्यांनी अस्पृश्यता आणि जातिवादाविरुद्ध आवाज उठवला आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काम केले. यासोबतच त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक चळवळही सुरू केली. फुलेंनी शिक्षण आणि समानतेच्या माध्यमातून समाज बदलण्याचे स्वप्न पाहिले होते. जे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणूनच, ११ एप्रिल रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त, महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही अनमोल विचार आज आम्ही शेअर करत आहोत.

 

कशी मिळाली महात्मा ही पदवी-

महात्मा ज्योतिबा फुले एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्याचा उद्देश जातीय भेदभाव दूर करणे आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना न्याय प्रदान करणे हा होता. हा समाज सत्याच्या शोधावर आणि समानतेच्या संवर्धनावर आधारित होता. १८८८ मध्ये, विठ्ठलराव कृष्णाजी वांडेकर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली, ज्याचा अर्थ – ‘महान आत्मा’. महात्मा फुले यांनी भेदभाव, जातीभेद आणि अस्पृश्यता यासारख्या वाईट प्रथांना विरोध केला आणि शुद्धता आणि अशुद्धतेचे खोटे नियम नाकारले.

 

महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचार-

 

* ”खरे शिक्षण म्हणजे इतरांना सक्षम बनवणे आणि आपल्याला जे मिळाले त्यापेक्षा थोडे चांगले जग सोडून देणे.”

* आर्थिक विषमता ही शेतकऱ्यांच्या जीवनमानात घसरण घडवते.

*”चांगल्या उद्देशासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.”

*”जर तुम्ही एका पुरूषाला शिक्षित केले तर तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित करता पण जर तुम्ही एका महिलेला शिक्षित केले तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करता.”

*”शिक्षण ही पुरुष आणि स्त्रियांची प्राथमिक गरज आहे.”

*नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।

*”स्वार्थ वेगवेगळे रूप घेतो. कधी जातीचा, कधी धर्माचा”

*”कोणत्याही व्यक्तीने अन्याय सहन करू नये, मग तो स्वतःवर असो किंवा दुसऱ्यावर.”


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News