तुम्हालाही होतोय उष्णतेचा त्रास?; सब्जा करेल मदत… जाणून घ्या फायदे

जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळा म्हटलं की रणरणतं ऊन,सतत घशाला पडणारी कोरड, घाम या सगळ्या गोष्टी ओघाओघाने आपोआप समोर येऊ लागतात. त्यामुळे प्रचंड होणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेला प्रत्येक व्यक्ती शीतपेय किंवा तत्सम थंड पदार्थांकडे आपसुकच वळतो. परंतु, हे थंड पदार्थ तात्पुरते शरीराला सुखावतात. त्यामुळे या शितपेयांऐवजी ताक, कोकम सरबत, सब्जा घातलेलं पाणी, नारळ पाणी हे घरगुती आणि नैसर्गिक पर्याय कायमच फायदेशीर ठरतात. त्यामुळेच शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या सब्जाचे फायदे आज आपण जाणून घेऊयात.

हृदयविकारावर गुणकारी

तब्येत चांगली ठेवायची असेल तर हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं आवश्यक आहे. सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतात. या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पाण्यात सब्जा घालून या पेयाचे नियमित सेवन केल्यास यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत करते

सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते. हे शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी

सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता.

त्वचेसाठी फायदेशीर

केवळ आरोग्याच्या तक्रारींसाठीच नाही तर त्वचेसाठीही सब्जा चांगला असतो. हवेतील प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होत असतो. प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. मात्र त्वचेच्या समस्या दूर कऱण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज केल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते.

सब्जाच्या सेवनाचे फायदे 

  • उष्णतेचे विकार दूर होतात.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
  • वजन नियंत्रणात राहते.
  •  शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते. लघवीस त्रास होत असल्यास समस्या दूर होते. मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग (युरिन इन्फेक्शन) दूर होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News