Kitchen Hacks: भाजीत मीठ जास्त झालंय? थांबा, ‘या’ ट्रीक्सने वाढवा जेवणाची चव

Kitchen Tricks: भाजीत मीठ जास्त झालंय? मग ट्राय करा 'या' टिप्स

Tips to reduce salt in food:  आहारात केलेला मीठाचा वापर केवळ तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही, तर ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. शिरा आणि स्नायूंच्या कार्यासाठी आणि आपल्या शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्यासाठी मिठाचा वापर खूप महत्वाचा आहे. जेवणात मीठ नसल्याने जेवणाची चव बिघडते. पण जर भाजीत जास्त मीठ असेल तर त्याची चव आणखी खराब होते. कोणत्याही खास प्रसंगी, भाजीत जास्त मीठ असल्यास, केवळ मूडच खराब होत नाही तर संपूर्ण भाजीही फेकून द्यावी लागते. अशा परिस्थितीत, जर भाज्यांमध्ये जास्त मीठ असल्याने तुमची मेहनत वाया गेली तर आम्ही तुम्हाला काही खास ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही भाज्यांमधील जास्त झालेले मीठ सहज कमी करू शकता.

बटाटयाच्या वापर-

डाळ किंवा भाजीमध्ये मीठ प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास, त्यामध्ये १-२ चिरलेले कच्चे बटाटे घाला आणि भाजी थोडा वेळ शिजवा. अशाप्रकारे बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेतो. नंतर त्या भाजीतून बटाटे बाजूला काढा. अशाप्रकारे तुमची भाजी खराब होणार नाही.

दही-

भाजीमध्ये जास्त मीठ पडले असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. मीठ कमी करण्यासाठी, भाजीत एक किंवा दोन चमचे दही घाला आणि ते चांगले मिसळा. भाजीत दही घालताच ते मीठाचे प्रमाण संतुलित करेल आणि भाजीची चवही वाढवेल.

कणिक-

डाळ किंवा भाज्यांमध्ये जास्त मीठ असेल तर घाबरू नका. अशा परिस्थितीत, तुम्ही कणकेचा गोळा करून वापरू शकता. कणकेचा गोळा भाजी किंवा डाळीत काही वेळ ठेवा आणि नंतर काही वेळाने बाहेर काढा. भाजी किंवा डाळीमध्ये कणकेचा गोळा घातल्याने ते अतिरिक्त मीठ शोषून घेईल. आणि भाजीची चव सामान्य होईल.

लिंबाचा रस-

व्हिटॅमिन सी नेसमृद्ध असलेले आणि चवीला आंबट असलेले लिंबू भाज्यांमधील मीठ कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. जर डाळी किंवा भाज्यांमध्ये जास्त मीठ असेल तर काळजी करण्याऐवजी लगेच त्यात लिंबाचा रस घाला. लिंबाचा आंबटपणा मिठाचे प्रमाण कमी करेल. आणि भाजी फेकावी लागणार नाही.

तूप-

भाज्या किंवा डाळींमधील अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी तूप खूप प्रभावी आहे. जर जेवणात जास्त मीठ असेल तर भाजी किंवा डाळीमध्ये एक चमचा देशी तूप घाला. अशाप्रकारे भाजीची चव सुधारेल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News