ओठांभोवतीचा काळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

ओठांचा काळेपणा घालण्यासाठी सोपे घरगुती उपाय

प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा चेहरा नेहमीच तेजस्वी दिसावा आणि तिचे सौंदर्य कायम अबाधित राहावे. ती तिचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करते. ओठ हा आपल्या चेहऱ्याचा फार महत्वाचा भाग आहे. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात. गुलाबी ओठ असल्यास सौंदर्यात आणखीच भर पडते. पण चेहऱ्यावरील काही समस्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात, त्याचप्रमाणे एक समस्या म्हणजे ओठांभोवतीचा काळेपणा. ओठांभोवतीचा काळेपणा दूर करण्यासाठी, तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांचा वापर करू शकता.

तांदळाच्या पिठाचा वापर

ओठांभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता, तांदळाचे पीठ त्वचा स्वच्छ करण्याचे काम करते. हे पीठ नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते, त्याच्या वापरामुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्याचा रंग सुधारतो.

दह्याचा वापर

त्वचा स्वच्छ करण्यासाठी दह्याचा वापर देखील करता येतो, जर तुमच्या ओठांभोवती काळेपणा असेल तर तुम्ही दह्याचा वापर देखील करू शकता. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड टॅनिंग दूर करण्यास मदत करते. याशिवाय, ते त्वचा मऊ करण्यास देखील मदत करते.

मधाचा वापर

त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात, काही दिवसांत तुम्हाला फरक दिसू लागेल.

ओठांभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी तांदळाचे पीठ आणि मध एकत्र करून एक सोपा उपाय वापरू शकता. तांदळाचे पीठ त्वचेला उजळ करते आणि मध ओठ मऊ ठेवतो, ज्यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होते.

स्क्रब कसा बनवायचा

1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1/2 चमचा मध घ्या. मिश्रण पातळ वाटल्यास, थोडे दूध किंवा पाणी मिक्स करा. हे मिश्रण ओठांभोवती लावा. 1-2 मिनिटे हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मसाज करा. 10-15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News