वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन करताना, आपण हळूहळू तणावाचे बळी बनतो. जगभरातील अर्ध्याहून अधिक लोक या समस्येचे बळी ठरले आहेत. हा जीवनाचा एक भाग बनला आहे, ज्यामुळे लहान वयातच विविध प्रकारचे आजार आपल्याला घेरू लागतात. आपली भूक कमी होते. झोप येत नाही आणि काम करण्याची इच्छाही होत नाही. आजकाल परिस्थिती अशी बनली आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळेही खूप ताण घेतो. कधीकधी ते गंभीरही बनते. तणाव कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय देखील करतात. मात्र, तणाव कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हे आपण बघणार आहोत.
जर तुम्हीही या सर्व समस्यांनी वेढलेले असाल. जर तुम्ही तणाव, चिंता यांनी ग्रस्त असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही टिप्स अवलंबून तुम्ही त्या तुमच्या आयुष्यातून काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला तुमची इच्छाशक्ती बळकट करावी लागेल.

‘या’ टिप्स फॉलो करा
तणाव कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते काम केले पाहिजे. जर तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असतील, तुम्हाला नृत्य किंवा चित्रकला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत तुमची आवडती क्रिया करू शकता. ज्यामुळे तुमचे मन दुसरीकडे भटकेल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल.
पुरेशी झोप घ्या
तणावमुक्त राहण्यासाठी कमीत कमी ८ ते ९ तास झोप घ्या. यामुळे मनाला विश्रांती मिळेल आणि सर्व चिंता दूर होतील. दिवसभर एकाच विषयावर विचार केल्यास माणसाचे डोके जड होते. ज्यामुळे ताण आणि तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून, पुरेशी झोप घ्या.
प्राणायाम करा
ताण आणि तणाव दूर करण्यासाठी दररोज थोडा वेळ प्राणायाम करा. हा व्यायाम नियमितपणे केल्याने तुम्हाला आराम वाटेल.