उन्हाळ्याच्या झळा वाढत आहे. पारा 40 पार करतो आहे. या घामांच्या धारांमध्ये घरातील एसी थंडावा देतोय. मात्र, हा थंड AC ची काळजी घेतली नाही तर हा थंड AC आगीचा गोळा बनू शकतो. चुकीचा वापर आणि मेंटेनेंसकडे दुर्लक्षाने एसीमुळे घरात मोठी दुर्घटना देखील घडू शकते. तज्ज्ञांच्या मते जास्त प्राॅब्लेम हे जुन्या एसी आणि चुकीची फिटींग यामळे येतात. त्यामुळेच एसीचा योग्य वापर कसा करायचा याचा अभ्यास करायला हवा.
कित्येकदा AC मध्ये लिकेज झाल्याने गॅल लिक होते त्यामुळे मशिनच्या आतमध्ये प्रेशर वाढत किंवा घराच्या लाईटमध्ये प्राॅब्ले येत असतात. AC चेक करून अनेकवर्ष लोटली असतील तर मोठे संकट तुमच्यासमोर उभे राहू शकते. धोका देखील वाढतो. इलेक्ट्रिक तज्ज्ञ सांगतात की, दरवर्षी उन्हाळ्याच्या आधी AC योग्य स्थितीत आहे की नाही याची तपासणी करायला हवी. कारण अनेक पार्ट हे लवकर खराब होत असतात. चांगला ब्राँड आणि नीट सर्व्हिसिंग यामुळे तुम्ही दुर्घटनेपासून वाचू शकता.

AC चा स्फोट होऊ नये म्हणून या पाच चूका करू नका
- – स्वस्त आणि बिना क्वालिटीचा एसी घेऊ नका. यातील पार्ट खराब असतात. ते जास्त लोड सहन करू शकत नाही
- – स्वतः AC दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नका. एक्सपोर्ट टेक्निशियनकडून दुरुस्ती करून घ्या.
- -अनेक तास AC सुरुच ठेवणे. यामुळे मशीन गरम होऊन खराब होऊ शकते.
- -AC वर खूप सारे साहित्य ठेवणे. ज्यामुळे हवेचा रस्ता बंद होतो.
- – होल्टेज कमी जास्त होते मात्र त्यापासून संरक्षणासाठी स्टेबलायजर वापर न करणे,
AC सुरक्षित ठेवण्यासाठी सात टिप्स
- AC खरेदी करण्यापूर्वी एनर्जी रेटींग आणि ब्रँड चेक करा
- प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी सर्व्हिसिंग करा. गॅस लेव्हल, वायरिंग, कम्प्रेशर चेक करा
- AC च्या आसपास दोन फूटापर्यत मोकळी जागा ठेवा ज्याने हवा खेळती राहील.
- नेहमी स्टेबलायझरचा वापरक करा ज्यामुळे व्होल्टेजचा प्राॅब्लेम येणार नाही
- रात्रीभर AC सुरू ठेऊ नका. चार पास तासाने ब्रेक द्या.
- AC मधूम वेगळाच आवाज किंवा वास येत असते तर लगेच टेक्निशयनला बोलवा.
- लहानमुलांना AC पासून दूर ठेवा.
सेफ्टी एक्सपर्ट्स म्हणतात नीट काळजी घेतली तर 90 टक्के दुर्घटना टाळली जाऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या आणि उन्हाळ्यात AC च्या थंडाव्याचा आनंद घ्या