शेवग्याच्या पानांची पावडर आणि त्याचे फायदे….

आरोग्यदायी शेवग्याची पावडर जाणून घ्या औषधी गुणधर्म

शेवग्याच्या पानांची पावडर आयुर्वेदात एक अत्यंत उपयुक्त औषधी मानली जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

शेवग्याच्या पानांची पावडर आणि त्याचे फायदे

पचनक्रिया सुधारते

शेवग्याची पावडर पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. ही पावडर बद्धकोष्ठता, गॅस, सूज आणि पोटदुखी बरी करू शकते. हे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

सांधेदुखीपासून मिळतो आराम

शेवग्याच्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे संधिवात वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील सूजही कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्याच्या सेवनाने पुरुषांची प्रजनन क्षमता देखील सुधारू शकते, कारण ते तणाव आणि अंतर्गत समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे.

मधुमेह

मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याला निसर्गाचे वरदान म्हटले जाते. शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणधर्म असतात.

रोगप्रतिकारशक्ती

अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुळे प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी होते.

हृदयविकार

अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारतात, ज्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रक्तदाब

शेवग्याच्या पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करतात. अल्सर, ट्यूमर, नियंत्रण, सांधे दुखी सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News