Diabetes Care: डायबिटीसच्या रुग्णांनी करा ‘हे’ घरगुती उपाय, नियंत्रणात राहील रक्तातील साखर

Type 2 Diabetes: डायबिटीसच्या रुग्णांनी करा 'हे' घरगुती उपाय, नियंत्रणात राहील ब्लड शुगर

Home Remedies for Diabetes:  मधुमेह ही इतकी गंभीर समस्या आहे की ती इतर अनेक आजारांचा धोका घेऊन येते. हा एक जीवनशैलीचा आजार आहे. जो जगभरातील प्रौढांपासून ते मुलांपर्यंत सर्व लोकांना खराब जीवनशैलीमुळे प्रभावित करत आहे. असे म्हटले जाते की भारतात सुमारे ५० लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. टाइप २ मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिन योग्यरित्या तयार करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. यामध्ये औषधांनी उपचार करणे खूप महत्वाचे आहे. परंतु त्यासोबत काही घरगुती उपाय देखील तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील.  आज आम्ही तुम्हाला टाइप २ मधुमेहासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे दिवसायला खूप सामान्य आहेत परंतु बरेच फायदे  देऊ शकतात. चला तर  घेऊया…

तुळशीची पाने-

तुळशीची पाने अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवतात. तुळशीची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या आहारात तुळशीचा चहा समाविष्ट करू शकता. किंवा सकाळी तुळशीची पाने चावून खाऊ शकता.

 

मेथी-

मेथीला एक औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. मेथीमध्ये असलेले फायबर आणि अल्फा-ग्लुकोसिडेस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. सकाळी उठल्यानंतर मेथीचे पाणी प्यायल्याने तुमचा मधुमेह नियंत्रणात राहतो.

 

कारले-

कारल्यामध्ये असलेले पोषक घटक तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. त्याच्या सेवनाने इन्सुलिनचे उत्पादन देखील वाढते. दररोज सकाळी एक ग्लास कारल्याचा रस पिणे फायदेशीर आहे. कारल्यामध्ये असलेले काही संयुगे, जसे की पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स, मधुमेहाच्या उपचारात मदत करू शकतात. शिवाय कारल्यामुळे रक्त शुद्ध होते.

 

जवस  बिया-

जवस बियांमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठीही त्याचे सेवन खूप उपयुक्त आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जवसाच्या बियांचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांमध्ये साखरेची पातळी सुमारे २८ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

 

दालचिनी-

दालचिनीमध्ये मधुमेह नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. दालचिनीमध्ये असलेले एक पदार्थ इन्सुलिनचे उत्पादन वाढवू शकते. हे इन्सुलिनच्या निर्मितीस मदत करते.
तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.

 

हळद-

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवते. यामध्ये असलेले कर्क्यूमिन मधुमेह कमी करण्यास मदत करते. याशिवाय, हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील भरपूर असतात. जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा समावेश अनेक प्रकारे करू शकता.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News