तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय नक्की करुन पाहा…

सतत तोंड येतं? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

वारंवार तोंड येणे एक सामान्य समस्या आहे, जी अनेक कारणांमुळे होऊ शकते. या कारणांमध्ये दुखापत, संसर्ग, ताण, काही विशिष्ट पदार्थ आणि औषधे यांचा समावेश आहे. असंतुलित आहार, अपचन, पोट सतत खराब होणे, मसाल्याच्या पदार्थ्यांचे सतत सेवन किंवा अॅसिडिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे वारंवार सेवन यामुळे तोंडात येण्याची  समस्या उद्भवत असते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला तोंडा आल्यास काय करावे याविषयी माहिती देणार आहोत.

तोंड येण्यामागची कारणे

  • आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली
  • जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता
  • दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे,
  • दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,
  • कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे
  • तंबाखू दारू, गुटखा याचं सेवन करणे
  • मानसिक ताणतणाव
  • अपुरी झोप
  • अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे
  • कमी प्रतिकारशक्ती
  • जीवनसत्त्वांची कमतरता
  • वारंवार टुथपेस्ट बदलणे
  • कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.

 तोंड येण्याची लक्षणे

तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो.  पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.

तोंड येण्याच्या समस्येसाठी घरगुती उपाय

थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे

थंड पाणी आणि बर्फामुळे वेदना आणि सूज लगेच कमी होते. बर्फाचा तुकडा घ्या आणि तोंड आलेल्या भागावर हलक्या हाताने फिरवा. थंड पाणी प्यायल्याने देखील आराम मिळतो. हे दिवसातून तुम्ही कितीही वेळा करू शकता.

मीठाच्या पाण्याची गुळणी

कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे तोंडातला संसर्ग कमी होतो आणि वेदना कमी होतात.

ग्लिसरीन आणि हळद

ग्लिसरीन आणि हळद पावडर ही तोंड येण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे फोडातील जळजळ कमी होते. ते वापरण्यासाठी ग्लिसरीनमध्ये थोडी हळद मिसळा. आता ते तुमच्या फोडांवर लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा, असे केल्याने अल्सरची समस्या दूर होईल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News