कंबरदुखी अनेक स्त्रियांमध्ये एक सामान्य समस्या आहे. वेळीच उपाय न केल्यास आयुष्य भर हा त्रास सहन करावा लागतो. घरकामात नेहमी खाली वाकणे तसेच जॉब साठी सतत खुर्चीवर बसून काम करणे इत्यादी कारणाने महिलांना व युवतींना कंबर दुखीचा त्रास होतो.
कंबरदुखीची कारणे
- मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदलांमुळे आणि स्नायूंच्या ताणांमुळे कंबरदुखी होऊ शकते.
- गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाच्या वाढीमुळे आणि कमरेच्या स्नायूंवरील ताण वाढल्याने कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
- स्नायूंचा ताण, सांध्याची दुखापत किंवा स्नायूंच्या कडक होण्यामुळे कंबरदुखी होऊ शकते.
कंबरदुखीवरील उपाय
- रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेका.
- रोज 1 चमचा सुंठवडा खाल्याने खूप फरक पडतो.
- मोहरीचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल यात लसूण घालून ते उकळावे व त्या तेलाने मालिश करावी.
- आहारात खनिजे, जीवनसत्व असणे आवश्यक आहे म्हणजे कबरेची झीज भरून निघेल व कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर सज्ज होईल.
- योगासने केल्याने देखील कंबरदुखी वर खूप फरक पडतो चक्रासन हे आसन नियमित केल्याने जुन्या कंबरेच्या तक्रारी दूर होतात.
- जेवण झाल्यावर किंवा सहज म्हणून बडीशोप खातो तसं जवस चावून खावे कम्बरदुखी व गुडघेदुखी ला खूप फरक पडतो.
- पांढरे तीळ खाल्याने हाड मजबूत होतात व कंबरदुखी थांबण्यासाठी मदत होते.
- तिळाच्या तेलाने मालिश करावी फरक पडेल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)
