जास्त उन्हात जाणे किंवा कोरडी त्वचा यामुळे कोपर काळे होणे ही एक सामान्य समस्या आहे. कोपरांवरील मृत पेशी काढून टाकण्याची गरज आहे, कारण मृत पेशी जमा झाल्यामुळे त्वचा काळी आणि खडबडीत होते. पण काही घरगुती उपायांनी ते सहज बरे होऊ शकते. कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी अनेक सोपे घरगुती उपाय आहेत. लिंबू, मध, दही, हळद, कोरफड, बटाटा आणि खोबरेल तेल यांसारख्या नैसर्गिक उपायांनी कोपऱ्यांचा काळेपणा कमी करता येतो.
लिंबू
सर्वप्रथम एक लिंबू घ्या, एक लिंबू कापून त्याचा रस कोपरावर १० मिनिटे चोळा, नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

दही आणि हळद
दह्यामध्ये हळद मिक्स करून पेस्ट बनवा आणि कोपरावर 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर गरम पाण्याने धुवून घ्या.
बेकिंग सोडा आणि दुधाचे मिश्रण
एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे दूध मिसळून पेस्ट बनवा आणि कोपरांवर स्क्रब करा. यामुळे मृत पेशी निघून जातील.
नारळ तेल आणि साखरेचा स्क्रब
कोपर काळे पडू नयेत म्हणून, दररोज त्वचेला मॉइश्चरायझ करणे महत्वाचे आहे. आंघोळीनंतर कोपरांवर नारळ तेल, बदाम तेल किंवा कोरफडीचे जेल लावा, यामुळे त्वचा हायड्रेट राहील. मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करा. तुम्ही साखर आणि मध यांचे मिश्रण देखील वापरू शकता. उन्हातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा, कारण अतिनील किरणांमुळे त्वचा काळी पडू शकते. हे घरगुती उपाय तुमच्या कोपरांना चमकदार बनवतील.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)