उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. आंबा प्रेमी कधीही आंबा खाण्यासाठी तयार असतात. आंबा जेवढा गोड तेवढे आंबे खाण्याचे तोटे देखील आहेत, ते जाणून घेतले पाहिजेत.
आंबे खाण्याचे फायदे
- आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
- आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
- आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
- आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो.
- आंब्यात व्हिटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
आंबे खाण्याचे तोटे
- ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.
- आंबा हे सर्वात उष्ण फळ मानलं जात. जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात आंबे खाल्ले तर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, फोड येऊ शकतात.त्यामुळे तुम्ही आंबा प्रमाणात खा.
- जर तुम्हाला मधुमेह असेल तर अतिप्रमाणात आंबा खाणं चांगल नाही,ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नियंत्रणात आंबे खावेत. मधुमेहांची चाचणी नियमित करावी शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच आंबा खावा.
- आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.
- आंब्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास पोटात जास्त फायबर जातं. त्यामुळे पोट खराब होतं. जुलाब होतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
