रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. आंबेहळदीचे आरोग्यासाठीही अनेक कमालीचे फायदे आहेत.
पचन क्रिया सुधारते
जठराग्नि हा पचनसंस्थेतील एक महत्वाचा भाग आहे. पोटात अन्न गेल्यावर त्याचे रुपांतर ऊर्जेत करण्यासाठी जठराग्नि गरजेचा असतो. ही पचन क्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबेहळद फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी वरदान
आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आपण त्वचेवरचे डाग जावे किंवा पिंपल्स जावे यासाठी अनेक उपाय करत असतो. पण जर आठवड्यातून दोनदा जरी आंबेहळदीचा लेप चेहर्याला लावलात तर इतर उपाय करावेच लागणार नाहीत. ऊन्हामुळे चेहर्याची पार वाट लागून जाते. चेहरा अगदीच काळवंडतो. त्यावरही आंबेहळद हा मस्त उपाय आहे. चेहऱ्याचा जो खरा रंग आहे तो पुन्हा दिसायला लागतो.आंबेहळद त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवते, तसेच त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते.
औषधी उपयोग
अनेकदा रक्त गोठून एखादा अवयव काळा निळा पडतो. ते रक्त तसेच गोठलेले राहिले तर गाठ तयार होऊ शकते. असे होऊ नये म्हणून गोठलेल्या रक्तावर वेळीच उपाय करायला हवे. आंबेहळदीचा लेप गोठलेल्या अवयवावर लावल्याने रक्त सुटते.
आहारामध्ये फायदेशीर
आहारामध्ये आंबेहळदीचा समावेश करून घ्या. त्याचे लोणचेही तयार केले जाते. ते खाल्ले तरी फायद्याचे ठरेल. इतर पदार्थांमध्ये वापरा. काढा करून प्या. आंबेहळदीचा वापर केल्याने भूक सुधारते. योग्य तेवढीच भूक लागते.
पित्ताचा त्रास कमी करते
पित्ताचा त्रास असेल तर आंबेहळद घरात असायलाच हवी. आंबेहळद ही उत्तम पित्तशामक आहे. आंबेहळद उगाळून पोटाला लावा. काढा करून प्या. पित्ताचा त्रास हळूहळू नाहीसा होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)