मुंबई – लालबाग, परळ, प्रभादेवी आणि लोअर परेल या नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला प्रभादेवी येथील जुना आणि ब्रिटिशकालीन पूल म्हणजे एलफिस्टन पूल हा पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. दरम्यान, शिवडी-वरळी एलिवेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी नवा उड्डाणपूल एमएमआरडीए बांधणार आहे, त्यासाठी हा एलफिस्टन पूल पाडण्यात येणार आहे.
पर्यायी वाहतूक कशी आहे?
दरम्यान, वरळी, प्रभादेवी, भायखळा, परळ, सि-लिंक आणि कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहनांना चिंचपोकळीच्या ब्रिजचा पर्याय मार्ग उपलब्ध करून दिला आहे. तसेच परेल लोअर परेल पश्चिमेकडील प्रभादेवी आणि परेल पूर्वेला जाणारे वाहतूक दुपारी तीन ते अकरा या कालावधीत करी रोड ब्रिजचा वापर करतील. दादर पूर्व आणि पश्चिमेकडील वाहनांना पर्याय टिळख पूलचा वापर करता येणार आहे. तर हा पूल तोडल्यामुळे करी रोड येथील पूलावरून होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. भारतमाता सिनेमा, शिंगटे मास्टर चौककडून कृष्णा देसाई चौककडे जाण्यासाठी दुपारी तीन ते रात्री ११.०० पर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे.

हरकती आणि सूचना…
एलफिस्टन पूल हा ब्रिटिशकालीन कित्येक वर्षापासूनचा जुना पूल होता. हा पूल तोडण्यासाठी एमएमआरडीएकडून स्थानिक नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. तसेच हा ब्रिज तोडण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. कारण या वाहतुकीमुळे परेल पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा एकमेव पूल आहे. त्यामुळे अन्य पुलाची पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी आणि त्यानंतर पूल तोडण्यात यावा. असेही नागरिकांची मागणी होती. म्हणून एलफिस्टन पूल तोडण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. परंतु शिवडी-वरळी एलिव्हेटेड कलेक्टर प्रकल्पासाठी हा पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या ठिकाणी एमएमआरडीए लवकरच नवा पूल उभारणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी जाणार असाल तर आजची पर्यायी वाहतूक व्यवस्था बघूनच प्रवास करा, असे आवाहन करण्यात आले आहे.