आनंदाची बातमी! मेट्रो, रेल्वे, मोनो की बस आता एकाच तिकीटावर मुंबईत कुठेही फिरा, लवकरच येणार ‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’

सध्या ही प्रणालीची ट्रायल सुरु आहे. विशेष म्हणजे ही सेवा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप'चा आढावा मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकारी यांच्या सोबत बैठकीमधून घेतला होता.

मुंबई – मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. घड्याळाच्या काट्यावर आणि पायाला भिगंरी लावून मुंबईकर चालतात. त्यामुळं येथे वेळेच खूप महत्व आहे. मुंबई दळवळणाची आणि प्रवासाची विविध साधनं आहेत. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र आता मुंबईकरांना बस, मेट्रो, रेल्वे लोकल यांचा एकाच तिकिटावर प्रवसा करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती. मुंबईकरांचा प्रवास अधिक जलदगतीने व्हावा यासाठी ‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’ विकसित केले आहे. मुंबई वन कार्ड नावाचे हे अॅप येत्या महिन्याभरात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सेवा कधी सुरु होणार?

दरम्यान, मुंबईत एकाच तिकिटावर प्रवास ही सुविधा लवकरच येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. सध्या ही प्रणालीची ट्रायल सुरु आहे. विशेष म्हणजे ही सेवा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’चा आढावा मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकारी यांच्या सोबत बैठकीमधून घेतला होता. दरम्यान, ‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’ ही सेवा १५ जून २०२५ पर्यंत लागू करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’ ही सेवा

एकाच सिंगल अ‍ॅपवर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस आणि रेल्वे लोकल यांचा एकच अ‍ॅपद्वारे प्रवासी आपली यात्रा व्यवस्थितपणे प्लॅन करू शकतात. दरम्यान, पब्लिक ट्रांन्सपोर्टे ही प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा, दळवळण सुविधा विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे, आणि त्याचाच एख भाग म्हणून ‘सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅप’ ही सेवा प्रत्यक्ष जून महिन्यापासून सुरु करण्यात येईल. एकाच तिकिटावर मुंबईत तुम्ही कुठेही फिरु शकता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फायदे काय?

  • या अ‍ॅपद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे जवळ असणारे स्टेशन कळणार
  • प्रवाशाच्या जवळ कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे समजणार
  • वाहतुक जलदगतीने आणि सुलभीकरण होणार
  • मुख्य म्हणजे प्रवाशांचा मोठा वेळ या प्रणालीमुळं वाचणार
  • भविष्यात टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरु आहे

About Author

Astha Sutar

Other Latest News