बकरी ईद, म्हणजेच ईद-उल-अजहा, मुस्लिमांसाठी एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. जी इस्लामिक कॅलेंडरनुसार, 10 व्या दिवशी जुल-हिज्जा महिन्यामध्ये साजरी केली जाते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, यावर्षी 7 जून 2025 रोजी (शनिवार) बकरी ईद साजरी केली जाईल. बकरी ईदला बळी देण्यापूर्वी त्याचे दात का मोजले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? आते असं का आणि कशासाठी करतात? चला जाणून घेऊ.
बकरी ईद (ईद-उल-अजहा) म्हणजे काय?
बकरी ईद, ज्याला ईद-उल-अजहा असेही म्हणतात, हा एक इस्लामिक सण आहे जो त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हा सण पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाचा बळी देण्याची तयारी दर्शवल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ईद-उल-अजहाचा अर्थ ‘बलिदानाचा सण’ किंवा ‘बलिदानाची ईद’ असा होतो. हा सण त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे, जिथे लोक आपल्या प्रिय गोष्टींचा त्याग करून अल्लाहच्या आज्ञेचे पालन करतात.

बकरी ईद कशी साजरी करतात?
बकरी ईदच्या दिवशी, लोक सकाळी लवकर उठून नमाज अदा करतात. नमाज अदा केल्यानंतर, बळी देण्याची (कुर्बानी) परंपरा पाळली जाते. या दिवशी, मुसलमान विविध प्राण्यांची (बकरी, मेंढी, गाय, इ.) कुर्बानी देतात. कुर्बानी दिल्यानंतर, त्या प्राण्याचे मांस वाटून गरीब आणि गरजू लोकांना दिले जाते. तसेच, कुटुंबीयांमध्येही ते वाटले जाते. ईदच्या दिवशी, मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात आणि भेटवस्तू आणि मिठाई वाटतात.
कुर्बानी पूर्वी बकऱ्याचे दात का मोजतात?
कुर्बानी पूर्वी बकऱ्याचे दात मोजण्याची प्रथा आहे, कारण त्यातून बकऱ्याचे वय निश्चित करता येते. कुर्बानीसाठी साधारणपणे एक वर्षाचे बकरे निवडले जातात. दात मोजून त्यांची निश्चित वय तपासले जाते, ज्यामुळे कुर्बानी योग्य प्रकारे केली जाईल. कुर्बानीसाठी काही नियम आहेत, ज्यात बकऱ्याचे वय आणि आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. एक वर्षापेक्षा लहान किंवा मोठे बकऱ्याची कुर्बानी दिली जात नाही. बकऱ्याचे दात तिच्या वयाची एक अचूक कल्पना देतात. त्यामुळे, कुर्बानीपूर्वी बकऱ्याचे दात मोजून, ती योग्य वयाची आहे की नाही, हे तपासले जाते. बकऱ्याचे दात 4-6 असतील, तर ती एक वर्षाची मानली जाते. जर बकऱ्याचे दात 4-6 पेक्षा कमी असतील, तर तिची कुर्बानी दिली जात नाही. तसेच, 6 पेक्षा जास्त दात असल्यास, ती कुर्बानी योग्य मानली जात नाही. कुर्बानीचा अर्थ त्याग, समर्पण आणि अल्लाहच्या आज्ञेचे पालन करणे आहे, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)