दररोजच्या गर्दीतल्या लोकल प्रवासामुळे मुंबईकरांच्या दुखण्यात वाढ, मणका-मान-पाठदुखीच्या आजारांत वाढ

मुंबई गतिमान असल्याचं नेहमी सांगण्यात येतं. घडाळ्याच्या काड्यावर मुंबईकर धावत असतात. घर-ऑफिस या सगळ्यात वेळ देताना त्यांची दमछाक होते ती खरंतर लोकल प्रवासानं. सतत वाढणाऱ्या गर्दीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर आता परिणाम होताना दिसतोय. मान, पाठदुखीसारखे आजार कायमचे मागे लागतायेत. अशा स्थितीत नेमेकं काय करावं हे सांगणारा रिपोर्ट

मुंबई- उपनगरांत राहून दररोज दीड ते दोन तासांचा प्रवास करुन ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस प्रवास, हा मुंबईकरांच्या पाचवीला पुजलाय. दररोजच्या प्रचंड गर्दीत प्रवासाची सवयही आता मुंबईकरांना लागलीय. मात्र दिवसेंदिवस मुंबईतल्या वाढत्या गर्दीचा फयका आता लोकललाही बसू लागलाय. दररोज गर्दीत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनाही या लोकल प्रवासामुळे आजार जाणवू लागले आहेत.

गर्दीच्या वेळी सतत उभं राहणं, विचित्र अवस्थेत लोकलमध्ये तासनतास उभं राहणं यामुळं मुंबईच्या शरीर ठेवणीवरच त्याचा परिणाम होताना दिसतोय. मानदुखी, डोकेदुखी, मणक्याचे विकार यामुळं बहुसंख्य मुंबईकर त्रस्त असल्याचं पाहायला मिळतंय.

जीवनवाहिनी ठरतेय आजारवाहिनी?

मुंबईची लाईफलाीन अशी खरंतर लोकलची ओळख आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अगदी कसारा-खोपोली ते विरार-नालासोपाऱ्यापर्यंत लाखो प्रवासी दररोज लोकलमधून ये-जा करत असतात. ऑफिसच्या तासांप्रमाणेच दररोजचे प्रवाशाचे दोन ते चार तास या मुंबईकरांसाठी नित्यनियम झालेला आहे. अशात लोकलमध्ये वाढलेल्या गर्दीत प्रवास करताना होणाऱ्या हालांमुळे मुंबईकर त्रस्त आणि आजारी पडू लागलेत.

अनेकदा गाडीत जागा नसल्यानं अनेकांना उभ्यानंच प्रवास करावा लागतो. तोल सावरण्यासाठी हँडल सातत्यानं पकडून ठेवावे लागते. वारंवारा गाडी थांबण्याच्या प्रकारामुळं मानेवर आणि पाठीवर अतिरिक्त ताम येतो. यातून शरिराचे स्नायू दुखावले जातात. गर्दीचा रेटा वाढला तर शरिरावर येणाऱअयाताणामुळे स्नायू दुखावले जात असल्याचा प्रकारही पाहायला मिळतोय.

कोणत्या आजारांचं वर्चस्व

दररोज लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची डोकेदुखी, चिडचिड वाढताना पाहायला मिळतेय. उन्हाळ्याच्या काळात तर यात दररोज वाढच होताना दिसतेय. यासोबतच मानदुखी, स्पॉंडेलिसिस म्हणजेच मणक्याचे आजारही वाझीला लागल्याचं पाहायला मिळतंय. सतत गर्दीत उभं राहून येत असलेल्या ताणानं हाताची आणि मानेची ठेवण बदलताना दिसतेय.

लोकलच्या गर्दीत मोबाईलचाही ताप

ऐन गर्दीच्या वेळीही मुंबईकरांचा मोबाईल शांत राहत नाही. इतक्या जीवघेण्या गर्दीतही मोबाईलवर मोठमोठ्या आवाजात गप्पा, गाणी ऐकण्याचे प्रकार, रील्स पाहण्याचे प्रकार सुरु असतात. व्हॉट्सअप मेसेजिंगही सुरु असतं. यामुळं डोकं सतत खाली ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे टेक्स्ट नेकचा आजारही बळावताना दिसतोय. एका हातात मोबाईल ठेवून तोल सावरण्याच्या या नादात खांदेदुखीच्या, पाठदुखीच्या रुग्णांतही वाढ झालीय. इतरांच्या मोबाईल संभाषणाची अनावश्यक माहिती सातत्यानं कानावर पडत राहिल्यानं चिडचिडीत वाढ होताना दिसतेय.

लोकल प्रवासात काय काळजी घ्याल?

1. लोकल प्रवासाच्या गर्दीत शांत राहणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं चिडचिड, अस्वस्थपणा येणार नाही
२. प्रवासाच्या काळात मोबाईल कमी वापरण्यावर भर द्यावा
३. स्क्रीन टाईम कमी झाल्यास किंवा त्यातून ब्रेक घेतल्या, मणक्यावर आणि मानेवर येणारा ताम कमी होऊ शकतो.
४. जास्त वेळ उभं राहवंच लागत असल्यानं दोन्ही पायांवर समान वजन देण्याचा प्रयत्न करावा
५. प्रवासादरम्यान मानेचा व्यायाम करावा, यामुळे जडपणा आणि अस्वस्थपणा कमी होऊ शकतो.
६. जागा मिळाली तर पाठीला टेकून बसण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मणका आणि पाठीला आराम मिळू शकतो.


About Author

Smita Gangurde

Other Latest News